Tuesday, March 28, 2023
Tuesday, March 28, 2023

घरFact CheckWeekly Wrap: रणवीरने फेकला चाहत्याचा फोन, दलित मुलीस मारहाण, हिंदुत्व रॅलीस मुस्लिमांचा...

Weekly Wrap: रणवीरने फेकला चाहत्याचा फोन, दलित मुलीस मारहाण, हिंदुत्व रॅलीस मुस्लिमांचा अडथळा तसेच या आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

गेल्या आठवडाभरात सोशल मीडियावर अनेक व्हायरल दाव्यानी धुमाकूळ घातला. अभिनेता रणवीर कपूर ने आपल्या चाहत्याचा फोन फेकून दिला असा एक दावा व्हायरल झाला. युपी मध्ये हिंदुत्ववादी गुंडांनी दलित मुलीला क्रूरपणे मारल्याचा दावा एका व्हायरल व्हिडीओ च्या माध्यमातून करण्यात आला. एका बनावट वेबसाईटची लिंक देऊन ती उद्यम नोंदणीसाठी अधिकृत वेबसाईट असल्याचा दावा करण्यात आला होता. तर मुंबईत झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाला मुस्लिमांनी अडथळा आणल्याचा आरोप करणारा एक दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.

रणवीर ने चाहत्याचा फोन फेकला?

रणवीर ने चाहत्याचा फोन फेकला?

अभिनेता रणवीर कपूर इतका गर्विष्ठ झाला आहे की त्याने सेल्फी घेणाऱ्या एका चाहत्याचा फोन फेकून दिला. असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला होता. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.

हिंदूंच्या मोर्चाला मुस्लिमांनी विरोध केला नाही

हिंदूंच्या मोर्चाला मुस्लिमांनी विरोध केला नाही

मुंबई येथे झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाला मुस्लिमांनी विरोध केल्याच्या नावाखाली एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. आम्ही केलेल्या तपासात हा दावा पूर्णपणे चुकीचा आणि खोटा असल्याचे निदर्शनास आले आहे.

उद्यम नोंदणीची अधिकृत वेबसाईट कोणती?

उद्यम नोंदणीची अधिकृत वेबसाईट कोणती?

‘eudyogaadhaar.org’ ही वेबसाईट उद्यम नोंदणीसाठी अधिकृत असल्याचा दावा व्हायरल झाला होता. आमच्या तपासात हा दावा पूर्णपणे फसवणूक करणारा असल्याचे निदर्शनास आले.

हिंदू गुंडानी केली दलित मुलीस मारहाण?

हिंदू गुंडानी केली दलित मुलीस मारहाण?

उत्तरप्रदेश मध्ये हिंदू गुंडांनी दलित मुलीस क्रूरपणे मारहाण केली असल्याचे सांगत एक व्हिडीओ व्हायरल झाला. आमच्या तपासात हा जुना व्हिडीओ चुकीचा संदर्भ देऊन दिशाभूल करीत व्हायरल करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: [email protected]

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular