Authors
२२ तारखेला अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली. या घटनेला जोडून अनेक खोटे दावे मागील आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. राम मंदिर उद्घाटनापूर्वी अयोध्येत ड्रोन शो आयोजित करण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला. मेरीलँड, यूएसए मधील टेस्ला कार शोरूमच्या भारतीय मालकाने, राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी, टेस्ला म्युझिक शोचे आयोजन केले होते, ज्यामध्ये 100 टेस्ला गाड्यांचा समावेश होता. असा दावा करण्यात आला. एक रामभक्त हातावर चालत अयोध्येला जात आहे. असा दावा करण्यात आला. मीरा भायंदर येथे पोलिसांनी रात्री घरात घुसून मारत बाहेर काढले. असा दावा एक व्हिडीओ शेयर करून करण्यात आला. वृंदावनच्या रस्त्यांवर भक्तांच्या चप्पलांची देखभाल करणाऱ्या यशोदा यांनी राम मंदिरासाठी 51 लाख रुपये दान केले आहेत. असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
राम मंदिर उद्घाटनापूर्वी अयोध्येत ड्रोन शोचे आयोजन?
राम मंदिर उद्घाटनापूर्वी अयोध्येत ड्रोन शो आयोजित करण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
टेस्ला कार शो चे आयोजन शोरूम मालकाने केले नाही
मेरीलँड, यूएसए मधील टेस्ला कार शोरूमच्या भारतीय मालकाने, राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी, टेस्ला म्युझिक शोचे आयोजन केले होते, ज्यामध्ये 100 टेस्ला गाड्यांचा समावेश होता. असा दावा करण्यात आला. हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले.
हातावर चालणारा माणूस अयोध्येला निघालाय?
एक रामभक्त हातावर चालत अयोध्येला जात आहे. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
मीरा भायंदर मध्ये पोलिसांनी घरात घुसून केली मारहाण?
मीरा भायंदर येथे पोलिसांनी रात्री घरात घुसून मारत बाहेर काढले. असा दावा एक व्हिडीओ शेयर करून करण्यात आला. हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले.
भक्तांच्या चप्पलांची देखभाल करणाऱ्या यशोदा यांनी राम मंदिरासाठी 51 लाख रुपये दान केले?
वृंदावनच्या रस्त्यांवर भक्तांच्या चप्पलांची देखभाल करणाऱ्या यशोदा यांनी राम मंदिरासाठी 51 लाख रुपये दान केले आहेत. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा