Monday, April 29, 2024
Monday, April 29, 2024

HomeFact CheckFact Check: भक्तांच्या चप्पलांची देखभाल करणाऱ्या यशोदेने राम मंदिरासाठी 51 लाख रुपये...

Fact Check: भक्तांच्या चप्पलांची देखभाल करणाऱ्या यशोदेने राम मंदिरासाठी 51 लाख रुपये दान केले? जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
वृंदावनच्या रस्त्यांवर भक्तांच्या चप्पलांची देखभाल करणाऱ्या यशोदा यांनी राम मंदिरासाठी 51 लाख रुपये दान केले आहेत.
Fact
हा दावा खोटा आहे. चित्रात दिसत असलेल्या महिलेने 2017 मध्ये तिचे घर विकून मिळालेले पैसे वृंदावनमध्ये गोशाळा बनविण्यासाठी दान केले होते.

22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाशी जोडणारा आणखी एक दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पिवळ्या कपड्यात बसलेल्या एका महिलेच्या फोटोसह दावा केला जात आहे की, वृंदावनच्या रस्त्यावर भक्तांच्या चप्पलांची देखभाल करणाऱ्या यशोदेने राम मंदिरासाठी 51 लाख रुपये दान केले आहेत.

एका छायाचित्रासह हा दावा व्हायरल झाला आहे की, वयाच्या 20 व्या वर्षी यशोदाजींना पतीविरह सोसावा लागला. तेव्हापासून त्यांनी आपले जीवन बांके बिहारी लाल यांना समर्पित केले. वृंदावनच्या गल्लीबोळात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या चपला तिने जपायला सुरुवात केली. त्यामुळे 30 वर्षांत 51 लाख रुपये जमा झाले. पोस्टनुसार, जेव्हा त्यांना राम मंदिराच्या बांधकामाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी 51,10,025/- रुपये राम मंदिरासाठी समर्पित केले. व्हायरल फेसबुक पोस्ट येथे आणि येथे पाहिले जाऊ शकतात.

X वरही हा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

न्यूजचेकरला आमच्या व्हाट्सअप टिपलाइनवर (9999499044) समान दावा पाठवून सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: भक्तांच्या चप्पलांची देखभाल करणाऱ्या यशोदेने राम मंदिरासाठी 51 लाख रुपये दान केले? जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य

Fact Check/Verification

तपासाच्या सुरुवातीला, आम्ही प्रथम व्हायरल इमेजवर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला 2017 मध्ये फेसबुकवर या फोटोसह शेअर केलेल्या काही पोस्ट सापडल्या.

Fact Check: भक्तांच्या चप्पलांची देखभाल करणाऱ्या यशोदेने राम मंदिरासाठी 51 लाख रुपये दान केले? जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य
Courtesy : Google

9 लाख फॉलोअर्स असलेल्या ‘Shri Banke Bihari Ji Vrindavan’ नावाच्या फेसबुक पेजने 22 मे 2017 रोजी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, “चित्रात दिसणार्‍या महिलेचे नाव यशोदा आहे, जी चप्पल बूटांची काळजी घेते. वयाच्या 20 व्या वर्षी ती विधवा झाली. गेल्या 30 वर्षात 51,02,550 रुपये जमवल्यानंतर त्यांनी 40 लाख रुपये खर्चून गोशाळा आणि धर्मशाळेचे बांधकाम सुरू केले आहे.”

Fact Check: भक्तांच्या चप्पलांची देखभाल करणाऱ्या यशोदेने राम मंदिरासाठी 51 लाख रुपये दान केले? जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य

अधिक तपास करताना, आम्ही संबंधित कीवर्डसाठी Google शोधले, ज्यातून आम्हाला 26 मे 2017 रोजी टाइम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केलेला रिपोर्ट सापडला. त्यात असे म्हटले आहे की 70 वर्षीय विधवेने वृंदावनमध्ये गोशाळा आणि धर्मशाळा बांधण्यासाठी अनेक दशकांपासून जमा केलेली बचत आणि तिची मालमत्ता विकून 40 लाख रुपये दान केले.

पुढील तपासात, आम्हाला 23 जून 2017 रोजी एबीपी न्यूजने चप्पलची देखभाल करून जमविलेले 40 लाख रुपये देऊन गोठा बांधल्याच्या व्हायरल दाव्याच्या तपासणीचा रिपोर्ट सापडला. या सर्व दाव्यांवर एबीपीच्या प्रतिनिधीने वृंदावनच्या या महिलेशी बातचीत केल्याचे या वृत्तात दाखवण्यात आले आहे. महिलेने सांगितले की ती कटनी, जबलपूर येथील रहिवासी आहे आणि पतीच्या मृत्यूनंतर वृंदावनला आली होती. तिने गोशाळा बांधण्यासाठी 15 लाख रुपये दिल्याचे ती सांगते. हे पैसे तिला चप्पल सांभाळून मिळालेले नसून कटनी येथील घर विकून मिळाले आहेत.

Conclusion

आमच्या तपासातून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलो की व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. तपासादरम्यान यशोदा नावाच्या महिलेचा हा फोटो 2017 मधील असल्याचे आढळून आले. चित्रात दिसणारी महिला मंदिराबाहेर शूज आणि चप्पल सांभाळते, परंतु 2017 मध्ये, तिने मध्य प्रदेशातील कटनी येथील घर विकून मिळालेले पैसे वृंदावनमध्ये गोशाळा बांधण्यासाठी दान केले.

Result: False

Our Sources
Report published by Times of India on 26th May 2017.
Report published by ABP News on 23rd June 2017.


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular