Monday, April 15, 2024
Monday, April 15, 2024

HomeFact CheckFact Check: मीरा भायंदर मध्ये पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याचे सांगणारा व्हायरल...

Fact Check: मीरा भायंदर मध्ये पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याचे सांगणारा व्हायरल व्हिडीओ जुना आहे

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
मीरा भायंदर येथे पोलिसांनी रात्री घरात घुसून मारत बाहेर काढले.
Fact
हा दावा खोटा आहे. व्हायरल व्हिडिओचा मीरा भायंदरशी कोणताच संबंध नाही. व्हिडीओ हैद्राबाद येथील असून एक वर्षांपूर्वीचा आहे.

मीरा भायंदर मध्ये पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याचे सांगणारा व्हायरल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार घिरट्या घालत आहे. X वर हा दावा करीत व्हिडीओ शेयर करण्यात आल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.

X वर असंख्य युजर्स हा दावा करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

फेसबुकवर रीलच्या माध्यमातून हा दावा करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे WhatsApp वर ‘Forwarded many times’ या सदराखाली हा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे.

Fact Check: मीरा भायंदर मध्ये पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याचे सांगणारा व्हायरल व्हिडीओ जुना आहे

२२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना झाली. या पार्श्वभूमीवर रविवार दि. २१ रोजी रात्री विजयोत्सव साजरा करणारा जमाव आणि दुसऱ्या गटात तणाव निर्माण झाल्याची घटना मीरा रोडवर घडली. नयानगर पोलिसांनी दाखल होऊन तणाव निवळला आणि बंदोबस्त दाखल करून संबंधितांवर कारवाईही सुरु करण्यात आली आहे. यादरम्यान सांप्रदायिक रंगाच्या असंख्य पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. याच क्रमाने मीरा भायंदर मध्ये पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याचे सांगणारा व्हायरल व्हिडीओ जोरदार फिरू लागला आहे.

Fact Check/Verification

Newschecker ने व्हायरल व्हिडीओ मुंबईच्या मीरा भायंदर भागातील असल्याच्या दाव्याचा शोध घेण्यासाठी सर्वप्रथम INVID च्या मदतीने व्हायरल व्हिडिओच्या की फ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. गुगल आणि यांडेक्स वर सर्च करूनही आम्हाला समाधानकारक परिणाम सापडले नाहीत.

दरम्यान आम्ही व्हिडिओतील आवाज बारकाईने ऐकले. यावेळी आम्हाला हैद्राबादी हिंदी बोलली जात असल्याचे ऐकू आले. पोलीस अधिकारी ज्यांना पकडत आहेत आणि लाठीने मारहाण करीत आहेत त्यांच्याशी संवाद साधत असताना वापरलेली भाषा आम्हाला हैद्राबादी असल्याचे ऐकायला मिळाले. यावरून सुगावा घेऊन काही किवर्डस सर्च केले असता, आम्हाला २६ ऑगस्ट २०२२ रोजी फेसबुकवर केलेली एक पोस्ट सापडली. ज्यामध्ये व्हायरल व्हिडीओचाच भाग आम्हाला पाहायला मिळाला.

Bh news या चॅनेलच्या फेसबुक पेजच्या हा व्हिडीओ शेयर करताना दिलेल्या माहितीनुसार, “प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल टी. राजा सिंह यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या व्यक्तींवर हैद्राबादच्या शालीबांदा भागात पोलिसांनी कारवाई केली. सायंकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास त्यांच्या घरांमधून त्यांना अटक करण्यात आली.”

यासंदर्भात आणखी तपास करताना आम्हाला सियासत डेली आणि द न्यूज मिनिट या माध्यमांनी २५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध केलेल्या बातम्या सापडल्या. यामध्ये व्हायरल व्हिडिओतील फुटेज प्रमाणे दिसणारी छायाचित्रे आणि हैद्राबादच्या शालीबांदा विभागात पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती आम्हाला मिळाली.

अधिक शोध घेत असताना, आम्हाला दैनिक Siasat च्या अधिकृत YouTube चॅनेलवर अपलोड केलेला २५ ऑगस्ट २०२२ चा ग्राउंड रिपोर्ट सापडला. ज्यामध्ये व्हायरल व्हिडियोसारखे सीन पाहता येतात. व्हिडिओमध्ये रिपोर्टर उस्मान हजारी अटक करण्यात आलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांशी बोलत आहेत. याशिवाय Gulbarga 24 News या यूट्यूब चॅनलवरही हा व्हायरल व्हिडिओ पाहता येईल.

आणखी तपास करण्यासाठी आम्ही व्हायरल व्हिडिओच्या पहिल्या फ्रेम मधील साइन बोर्डवरील मजकूर वाचला. ‘SHAFFAF Packaged Drinking Water’ असा तो मजकूर होता. आम्ही Geolocation च्या माध्यमातून Google Map वर याअनुषंगाने शोधले असता, व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या त्या गल्लीचे वास्तविक स्वरूप पाहायला मिळाले. मॅपवर गल्लीचे नाव ‘बनज्जा गल्ली’ असे असल्याचे समजले असून ही गल्ली किंवा विभाग तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथे येतो.

Fact Check: मीरा भायंदर मध्ये पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याचे सांगणारा व्हायरल व्हिडीओ जुना आहे

Conclusion

आमच्या एकंदर तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हायरल व्हिडिओचा मीरा भायंदरशी कोणताच संबंध नाही. व्हिडीओ हैद्राबाद येथील शालीबांदा भागातील असून एक वर्षांपूर्वीचा आहे.

Result: False

Our Sources
Facebook post bhnews.eng on 26 Aug 2022
Reports published by thenewsminute and Siasat on 25 Aug 2022
Video reports published on Youtube channels of Siasat Daily and Gulbarg 24 News on 25 Aug 2022.


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular