Authors
सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस कमी झाला मात्र सोशल मीडियावर पडणारा फेक पोस्टचा पाऊस सुरूच राहिला. ‘जय श्री राम’ वर बंदी घालण्याचे आवाहन मुस्लिम धर्मगुरू करीत आहे, असा दावा करण्यात आला. अमेरिकेच्या दौऱ्यानंतर राहुल गांधींवर सॅन फ्रान्सिस्कोस्थित वृत्तपत्राने टीका केली, असा दावा करण्यात आला. सुरतमध्ये गणपतीला मोदींचा नोकर दाखविण्यात आले आहे, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्रात रेल्वेत वृद्धाला झालेल्या मारहाणीनंतर पुन्हा एक मारहाणीची घटना घडली, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
‘जय श्री राम’ वर बंदी घालण्याचे आवाहन मुस्लिम धर्मगुरूने केले?
‘जय श्री राम’ वर बंदी घालण्याचे आवाहन मुस्लिम धर्मगुरू करीत आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा उपहासात्मक असल्याचे स्पष्ट झाले.
सॅन फ्रान्सिस्कोस्थित वृत्तपत्राने राहुल गांधींवर टीका केली?
अमेरिकेच्या दौऱ्यानंतर राहुल गांधींवर सॅन फ्रान्सिस्कोस्थित वृत्तपत्राने टीका केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
सुरतमध्ये गणपतीला मोदींचा नोकर दाखविण्यात आले नाही
सुरतमध्ये गणपतीला मोदींचा नोकर दाखविण्यात आले आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा संदर्भ बदलून झाल्याचे स्पष्ट झाले.
भारतात वृद्धाला मारहाणीची आणखी एक घटना घडली?
महाराष्ट्रात रेल्वेत वृद्धाला झालेल्या मारहाणीनंतर पुन्हा एक मारहाणीची घटना घडली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा