Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: सुपरस्टार जितेंद्रचे निधन, रेल्वेने बदलले नियम, दिल्लीचे रस्ते रक्ताने लाल...

Weekly Wrap: सुपरस्टार जितेंद्रचे निधन, रेल्वेने बदलले नियम, दिल्लीचे रस्ते रक्ताने लाल तसेच इतर प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवड्यातही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर फेक न्यूजची बरसात झाली. फ्रान्स येथे उसळलेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर अनेक असंबंध दावे करण्यात आले. सुपरस्टार जितेंद्रचे निधन झाले आहे, असा एक दावा करण्यात आला. भारतीय रेल्वेने आपल्या नियमात बदल केले असून ते 1 जुलै पासून लागू करण्यात आल्याचा दावा झाला. बकरी ईद ला कुरबानी दिल्यामुळे दिल्ली येथील रस्ते रक्ताने लाल झाल्याचा दावा करण्यात आला. भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी काझीच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा दिल्याचा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्याचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

Weekly Wrap: सुपरस्टार जितेंद्रचे निधन, रेल्वेने बदलले नियम, दिल्लीचे रस्ते रक्ताने लाल तसेच इतर प्रमुख फॅक्टचेक

1 जुलैपासून सुधारित 10 रेल्वे नियम होणार लागू?

भारतीय रेल्वेचे 10 नवीन नियम जे 01 जुलैपासून लागू होणार आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

Weekly Wrap: सुपरस्टार जितेंद्रचे निधन, रेल्वेने बदलले नियम, दिल्लीचे रस्ते रक्ताने लाल तसेच इतर प्रमुख फॅक्टचेक

बकरीदच्या निमित्ताने व्हायरल झालेला व्हिडिओ दिल्लीचा नाही

ईदच्या दिवशी दिलेल्या कुर्बानीमुळे दिल्लीचे रस्ते रक्ताने कसे लाल झाले, असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनाला आले.

Weekly Wrap: सुपरस्टार जितेंद्रचे निधन, रेल्वेने बदलले नियम, दिल्लीचे रस्ते रक्ताने लाल तसेच इतर प्रमुख फॅक्टचेक

सुपरस्टार जितेंद्रचे निधन झाले नाही

बॉलीवूड सुपरस्टार जितेंद्र यांचे निधन झाले, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांना अश्रू अनावर झाले. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.

Weekly Wrap: सुपरस्टार जितेंद्रचे निधन, रेल्वेने बदलले नियम, दिल्लीचे रस्ते रक्ताने लाल तसेच इतर प्रमुख फॅक्टचेक

प्रज्ञा ठाकूर यांनी ईदनिमित्त शुभेच्छा देण्याचा व्हिडीओ जुना

भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी काजी यांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा दिल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीचे संदर्भ देऊन केल्याचे दिसून आले.

Weekly Wrap: सुपरस्टार जितेंद्रचे निधन, रेल्वेने बदलले नियम, दिल्लीचे रस्ते रक्ताने लाल तसेच इतर प्रमुख फॅक्टचेक

व्हायरल दावे फ्रान्सच्या दंगलीचे नाहीत

फ्रान्स मध्ये दंगलीच्या पार्श्वभूमीवर काही व्हिडीओ शेयर करून ते सध्याचे असल्याचे दावे करणात आले. आमच्या तपासात हे दावे खोटे असल्याचे दिसून आले.

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular