Fact Check
Weekly Wrap: मुर्शिदाबाद दंगल, हत्तीची जेसीबी टक्कर ते लाडक्या बहिणींची फसवणूक पर्यंतच्या दाव्यांचे फॅक्ट चेक
एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडाही सोशल मीडियावरील फेक दाव्यांनी गाजला. मुर्शिदाबाद दंगल, हत्तीची जेसीबीला टक्कर ते लाडक्या बहिणींची फसवणूक सारखे असंख्य दावे झाले. भारतीय रेल्वेने १५ एप्रिल २०२५ पासून तत्काळ बुकिंगच्या वेळेत बदल केला आहे, असा दावा झाला. हिंदू सणांच्या वेळी मुस्लिमांनी निर्माण केलेले पश्चिम बंगालमधील अशांततेचे दृश्य, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्रात २१०० चा हप्ता ५०० वर आणून लाडक्या बहिणींची फसवणूक सुरु आहे, असा दावा करण्यात आला. हैदराबादमध्ये जंगले तोडण्यासाठी आलेल्या जेसीबीवर हत्ती हल्ला करत असल्याचा दावा करण्यात आला. मुर्शिदाबादमधील हिंदूंच्या रक्षणासाठी हजारो बजरंग दल कार्यकर्ते पश्चिम बंगालला रवाना झाले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

भारतीय रेल्वेची तत्काळ बुकिंगची वेळ बदलली?
भारतीय रेल्वेने १५ एप्रिल २०२५ पासून तत्काळ बुकिंगच्या वेळेत बदल केला आहे, असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

ते व्हायरल कोलाज खोटे आहे
हिंदू सणांच्या वेळी मुस्लिमांनी निर्माण केलेले पश्चिम बंगालमधील अशांततेचे दृश्य, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा आढळला.

२१०० चा हप्ता ५०० वर आणून लाडक्या बहिणींची फसवणूक सुरु आहे?
महाराष्ट्रात २१०० चा हप्ता ५०० वर आणून लाडक्या बहिणींची फसवणूक सुरु आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.

हैद्राबादमध्ये जंगले तोडण्यासाठी आलेल्या जेसीबीवर हत्तीने हल्ला केला?
हैदराबादमध्ये जंगले तोडण्यासाठी आलेल्या जेसीबीवर हत्ती हल्ला करत असल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

मुर्शिदाबाद दंगलीनंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते हिंदूंच्या मदतीला धावले?
मुर्शिदाबादमधील हिंदूंच्या रक्षणासाठी हजारो बजरंग दल कार्यकर्ते पश्चिम बंगालला रवाना झाले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.