Monday, June 24, 2024
Monday, June 24, 2024

HomeMarathiक्रिकेटर शार्दूल ठाकूर पैसे वाचविण्यासाठी दररोज लोकलने प्रवास करतो ? वाचा व्हायरल...

क्रिकेटर शार्दूल ठाकूर पैसे वाचविण्यासाठी दररोज लोकलने प्रवास करतो ? वाचा व्हायरल दाव्याचे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim-
अपने देश के लिए मैच को बचाने के लिए मैदान पर जडेजा का साथ देने वाले क्रिकेटर शार्दुल ठाकुर यात्रा का खर्च बचाने के लिए स्थानीय ट्रेन में सफर कर रहे हैं। 
मराठी अनुवाद- आपल्या देशासाठी सामना वाचवण्यासाठी मैदानात जडेजाला साथ देणारा क्रिकेटर शार्दूल ठाकूर प्रवासाचा खर्च वाचवण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास करत आहे. 
Verification
भारतीय क्रिकेट संघाचा गतिमान गोलंदाज शार्दूल ठाकूरचा एक फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या फोटोत शार्दूल मुंबईतील लोकल ट्रेन ने प्रवास करताना दिसत आहे. प्रवासाचा खर्च वाचवण्यासाठी शार्दूल लोकल ट्रेनने प्रवास करत असल्याचा दावा व्हायरल पोस्टमध्ये करण्यात येत आहे. फेसबुक आणि ट्विटर  वर अनेक यूजर्सनी शार्दूल ठाकूरचा हा फोटो शेअर केला आहे.
आम्ही काही किवर्ड्सच्या आधारे शार्दूल ठाकूरच्या लोकल प्रवासाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला, गूगलमध्ये शोध घेतला असता शार्दूलच्या लोकल प्रवासाच्या अनेक बातम्या दिसून आल्या. यात एबीपी माझाचाच्या बातमीचा व्हिडिओ देखील होता. हा व्हिडिओ मार्च 2018 मध्ये अपलोड करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतलेल्या टीम इंडियातील खेळाडूने चक्क मुंबई लोकल रेल्वेने घरी जाणं पसंत केलं. पालघरच्या शार्दूल ठाकूरने सवईप्रमाणे अंधेरी ते पालघर असा प्रवास लोकल रेल्वेने केला.
इतर माध्यमांतही शार्दूलने मायदेशी ुपरतल्यावर लोकल ट्रेनने प्रवास केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
यावरुन हेच स्पष्ट होते की क्रिकेटर शार्दूल याने गेल्यावर्षी दक्षिण अफ्रिका दौ-यावरुन मायदेशी परतल्यानंतर आपल्या घरी जाण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास केला होता. तो दररोज पैसे वाचवण्यासाठी लोकलने प्रवास करत असल्याची एक बातमी आढळली नाही. सोशल मीडियात त्याचा जुना फोटो व्हायरल करुन चुकीची माहिती पसरवली जात आहे.
Tools Used 
Twitter Advanced Search
Google Keywords search
Facebook Search
Result- Misleading

(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular