Claim–
जशोदाबेन मोदी म्हणाल्या माझे पति हे माझे होऊ शकले नाहीत तर ते देशावासियांचे कसे होतील, काय हेच महिला सबलीकरण आहे ?

Verifcation–
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांचा एक फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. यात त्या आपल्या हातात एक बोर्ड घेऊन उभ्या आहेत. यावर लिहिले आहे की माझे पति हे जर माझे होऊ शकले नाहीत तर ते देशवासियांचे कसे होतील, काय हेच महिला सबलीकरण आहे?
आम्ही या बाबत शोध सुरु केला असता आम्हाला फेसबुक वरदेखील ही पोस्ट आढळून आली.

आम्ही याबाबत गूगलमध्ये शोध घेतला असता जशोदाबेन यांनी नरेंद्र मोदींविरोधात अलिकडच्या काळात पोस्टरबाजी केल्याची कोणतीही बातमी आढळून आली नाही. त्यामुळे आम्ही हा फोटो गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधला असता पाच वर्षापूर्वी हिंदुस्तान टाईम्सच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातमीत हा फोटो आढळून आला. बातमीत म्हटले आहे की, जशोदाबेन यांनी आपली माहिती अधिकाराची लढाई सुरु ठेवली आहे. त्यांच्या भावाने सांगितले की जशोदाबेन यांनी पुन्हा एकदा माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज करुन त्यांना पुरवलेली सुरक्षा आणि मिळणा-या सुविधांचे विवरण मागितले आहे.

जशोदाबेन यांना माहिती न मिळाल्याने त्यांनी पुन्हा अर्ज केल्याची बातमी दैनिक लोकसत्ता मध्ये आढळून आली.

यावरुन हेच स्पष्ट होते की साॅफ्टवेअरच्या मदतीने जशोदाबेन यांचा जुना फोटो एडिट करुन तो सोशल मीडियात भ्रामक दाव्याने व्हायरल करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीआधी देखील हाच फोटो असाच एडिट करुन भ्रामक संदेश पसरवण्यात आला होता.
Sources
Facebook Search
Google Reverse image
Result- Fake
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)