Claim–
नीता अंबानी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर राजकीय भाष्य करणारे विवादास्पद टविट्स व्हायरल केले.
Verification–
मोहम्मद अयाज नावाच्या ट्विटर हॅंडलवर नीता अंबानी यांचे काही ट्विट्स ते स्क्रीनशाॅट्स शेअर करुन या अकाउंट्ची पडताळणी करण्याची विनंती केली होती.
देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरुन असंतोष निर्माण झाला आहे अशातच नीता अंबानींच्या नावाने असलेल्या ट्विटर अकाउंटवरुन अनेक ट्विट केले गेले यात नागरिकता सुधारणा विधेयक आणि इतर मुद्द्यावंर देखील ट्विट्स होते. आम्ही नीता अंबानी यांचे ट्विटर अकाउंट पाहण्याचे ठरविले पण त्यांच्या नावाची अनेक अकाउंट्स आढळून आली मात्र यातील एकही अधिकृत नव्हते.
याबाबत शोध सुरुच ठेवला असता आम्हाला
दैनिक सकाळच्या वेबसाईटवर नीता अंबानींच्या टविट संदर्भातील बातमी मिळाली. या बातमीत म्हटले आहे की नीता यांच्या बनावट ट्विटर अकाउंटवरुन मोदी शहा यांच्या समर्थानार्थ ट्विट केले गेले. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत काही विखारी मॅसेज ही शेअर करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.
तसेच बातमीत पुढे म्हटले आहे की रिलायंस ने याबाबत खुलासा केल्याने पुढील संकट टळले, रिलायंसकडून सांगण्यात आले आहे की नीता अंबानी यांचे कुठलेही टविटर अकाउंट नाही. त्यांचे छायाचित्र किंवा नाव असणारी अकाउंट्स बनावट आहेत.
तसेच आम्हाला
न्यूज 18 हिंदी या वेबसाईटवर देखील ही बातमी आढळून आली यात देखील रिलायंस ने हा खुलासा केल्याचे म्हटले आहे शिवाय ज्या अकाऊंट वरुन ही ट्विट्स व्हायरल करण्यात आली ते अकाऊंट ट्विटरने सस्पेंड केले असल्याचे आढळून आले.
यावरुन हेच स्पष्ट होते की नीता अंबानींचे कोणतेही ट्विटर अकाउंट नाही त्यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करुन खोटी माहिती सोशल मिडियात पसरवण्यात येत होती.
Tools Used
- Twitter Advanced Search
- Google Keyword Search
Result- False