Claim-
युपी पोलिसांनी महिला, वृद्धांना देखील मारहाण केली. सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देखील दिली. हेच ते पोलिस आहेत का ज्यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली होती ?

Verification–
Anjali नावाच्या ट्विटर हॅंडलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात काही पोलिस बुरखाधारी महिला आणि वृद्ध लोकांना मारहाण करताना दिसत आहेत. ट्विटमध्ये दावा करण्यात आला आहे की उत्तरप्रदेश पोलिस दलातील हे अधिकारी आणि कर्मचारी असून ते महिला आणि वृद्धांना मारहाण करत आहेत, सगळ्या लोकांना जेलमध्ये पाठवण्याची धमकीही देत आहेत. हेच ते पोलिस आहेत का ज्यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली होत तसचे पुढे म्हटले आहे की दंगेखोर हा प्रत्येकवेळी मुसलमान असल्याची गरज नाही कधी कधी ते खाकीत पण असतात.
सध्या एनआरसी आणि सीएए च्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशसह देशभरातील आंदोलनाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशातच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आम्ही याची सत्यता पडताळून पाहण्याचे ठरवले. यासाठी काही किवर्ड्स च्या सहाय्याने या व्हिडिओ ची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला उत्तर प्रदेश पोलिसांनी अशी कोणतीही मारहाण केल्याचा व्हिडिओ आढळून आला नाही.
आम्ही व्हिडिओ बारकाईने पाहिला असता पोलिसांच्या खांद्यावर चांद चा बॅच असल्याचे आढळून आले. भारतात कोणत्याही राज्यात अशा प्रकारचा बॅच पोलिस लावत नाहीत त्यामुळे हा व्हिडिओ पाकिस्तान किंवा बांगलादेशातील असण्याची दाट शक्यता निर्माण झाली.

याबाबत आम्ही काही किवर्ड्सच्या आधारे पु्न्हा या व्हिडिओचा शोध सुरु केला असता हेडलाइन्स न्यूज नावाच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ आढळून आला हा व्हिडिओ 26 जून 2019 रोजी अपलोड करण्यात आला आहे.
या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले आहे की पाकिस्तानच्या मुलतानमध्ये कोर्टातच एका पोलिसाने महिलेला मारहाण केली. याशिवाय ट्विटमधील कमेंटमध्ये काही युजर्सनी देखील हा व्हिडिओ पाकिस्तानचा असल्याचे म्हटले आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की व्हिडिओत उत्तरप्रदेश पोलिस नाहीत तर पाकिस्तानातील पोलिस आहेत. सोशल मीडियात चुकीच्या दाव्यानिशी हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Tools Used
Google Keyword Search
Twitter Advanced Search
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)