Friday, June 14, 2024
Friday, June 14, 2024

HomeFact CheckReligionहा स्वामी समर्थांचा ओरिजनल फोटो नाही, जाणून घ्या सोशल मीडियात व्हायरल दाव्याचे सत्य

हा स्वामी समर्थांचा ओरिजनल फोटो नाही, जाणून घ्या सोशल मीडियात व्हायरल दाव्याचे सत्य

Authors

Claim

श्री स्वामी समर्थांचा हा ओरिजनल फोटो आहे. जास्तीत जास्त शेअर करा.

Verification
फेसबुकवर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशीच एक पोस्ट Seema Pawar या यूजरने शेअर केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, श्री स्वामी समर्थांचा ओरिजनल फोटो दिसताच दर्शन घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरुन दुसरे पण दर्शन घेऊ शकतील.
याआधी देखील स्वामी समर्थांचे फोटो शेअर झाले होते. यामळे हा फोटो खरंच स्वामी समर्थांचा ओरिजनल फोटो आहे का याचा शोध घेण्याचे आम्ही ठरवले. गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला हा फोटो https://mas-india.com/ या वेबसाईटवर आढळून आला. हा फोटो गणेशपुरी येथील भगवान नित्यानंद यांचा असल्याचे म्हटले आहे. हा फोटो या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
आखणी एका वेबसाईटवर त्यांचे फोटो अपलोड करण्यात आले आहेत. याशिवाय sadgurunityananda.com या वेबसाईटवर देखील फोटो गॅलरीत अनेक फोटो आढूळन आले. त्यांचे हे फोटो डी सुवर्णा नावाच्या फोटोग्राफरने काढले आहेत.
स्वामी नित्यानंद कोण होते याबद्दल सामना या दैनिकातील लेखात माहिती देण्यात आली आहे.
तसेच एम. डी सुवर्णा हे भगवान नित्यानंद यांचे फोटोग्राफर असल्याचा माहिती मिळाली.
यावरुन हेच स्पष्ट होते की, सोशल मीडियात स्वामी समर्थाच्या नावाने भगवान नित्यानंद यांचा फोटो व्हायरल होत आहे.
Sources
Facebook Search
Google Reverse Image
Result- False 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular