Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeMarathiगृहमंत्र्यांनी CAB आंदोलकांना गोळ्या चालवण्याचे आदेश दिले? वाचा पोलिस अधिका-याच्या व्हायरल व्हिडिओचे सत्य

गृहमंत्र्यांनी CAB आंदोलकांना गोळ्या चालवण्याचे आदेश दिले? वाचा पोलिस अधिका-याच्या व्हायरल व्हिडिओचे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim

पोलिस अधिका-याने दावा केला आहे कि त्याच्यावर दगड फेकणा-या सीएबी आंदोलकांवर गोळ्या चालवण्याचा आदेश गृहमंत्र्यांनी दिला आहे.

Verification –
जलता हिंदुस्तान, जलता संविधान नावाच्या टविटर हॅंडलवर एक पोलिस अधिका-याचा व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. अधिकारी व्हिडिओमध्ये सांगत आहे की दगडफेक करणा-या सीएबी आंदोलकांवर गृहमंत्र्यांनी गोळ्या चालवण्याचे आदेश दिले आहेत. ट्विटमध्ये म्हटले आहे की रक्षकच भक्षक बनले आहेत सीएबी आंदोलकांवर थेट शूट एट साइट चे आदेश पोलिसांना दिले आहेत. देशाचे गृहमंत्रीच जर देशात गृहयुद्धासाठी आग्रही असतील तर काय बोलणार.
आम्हाला हाच दावा करणारे अनेक ट्विट्स आढळून आले.
मात्र या शोधादरम्यान आम्हाला आणखी एक ट्विट आढळून आले मात्र यात केलेला दावा हा वेगळा होता यात म्हटले आहे की, व्हिडीओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीला दोन दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तो पोलिस नव्हता. त्याने 2014 साली दिल्ली पोलिसा दलातून ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. पोलिसांचा गणवेश परिधान करणारा प्रत्येकजण पोलिस कर्मचारी नसतो.
यानंतर आम्ही राकेश त्यागी नावाने शोध सुरु केला असता आम्हाला त्याच्या संबंधीच्या अनेक बातम्या आढळून आल्या.
याशिवाय आम्हाला झी न्यूज च्या वेबसाईटवर बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की
नागरिकता सुधारणा अधिनियम (एनसीआर) च्या कारणावरुन दिल्लीत उफाळून आलेल्या हिंसाचारानंतर एका माजी हवालदाराने अत्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ बनविला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याने दिल्ली पोलिस उपनिरीक्षकाचा गणवेश परिधान करुन गाडीत व्हिडिओ बनविला होता.
या व्हिडिओत त्याने  गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार आंदोलकर्त्या लोकांना गोळ्या घालण्याची धमकी दिली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तातडीने कारवाई करत सायबर सेल युनिटमध्ये गुन्हा दाखल केला आणि शुक्रवारी राकेश त्यागी (( 54) याला अटक केली. मात्र, नंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. तो दिल्ली पोलिसात उपनिरीक्षक नाही, तर तो दिल्ली पोलिसात हवालदार होता, परंतु 2014 मध्ये काही कारणास्तव त्याने व्हीआरएस घेतली. त्यानंतर वेगवेगळ्या विषयांवर असे व्हिडिओ बनवत राहतो. जामियामधील हिंसाचारानंतर त्याने आपल्या गाडीत बसून असा व्हिडिओ बनविला व व्हायरल केला
यावरुन हेच स्पष्ट होते की गृहमंत्रालयाने किंवा गृहमंत्र्यांनी सीएबी आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिलेले नाहीत. पोलिसांनी हा खोटा व्हिडिओ तयार करणा-या माजी पोलिस कर्मचा-याला अटक सुद्धा केली होती. सोशल मिडियात हाच व्हिडिओ अजूनही व्हायरल होत आहे.
Tools Used 
  • Google Search
  • Twitter Advanced Search
Result- False 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular