Friday, March 29, 2024
Friday, March 29, 2024

HomeMarathiपुण्यातील नाही तर हैद्राबादमधील आहे कार फ्लायओव्हरुन कोसळल्याचा व्हिडिओ, व्हायरल झाला खोटा...

पुण्यातील नाही तर हैद्राबादमधील आहे कार फ्लायओव्हरुन कोसळल्याचा व्हिडिओ, व्हायरल झाला खोटा दावा

Authors

Claim-

 

पुण्यातील नाशिक फाटा येथील कासारवाडी फ्लायओव्हरवरुन कार पडली. सीसीटिव्ही फुटेज व्हायरल. 

 
 
Verification
 
 
व्हाट्सअप सध्या एक कार फ्लायओव्हरवरुन कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा ही दुर्घटना पुण्यातील कासारवाडी नाशिकफाटा फ्लायओव्हरवरील असल्याचा दावा या पोस्टमध्ये केला जात आहे. आमच्या एका वाचकाने आम्हाला हा व्हिडिओ व्हाट्सअॅपवर पाठवला असून याबाबत सत्यता तपासण्यास सांगितले. 
 
आम्हाला प्राप्त झालेल्या या व्हिडिओची पडताळणी सुरु केली. यासाठी आम्ही गूगलमध्ये पुणे नाशिकफाटा फ्लायओव्हरवरुन उलटली या किवर्ड्सच्या आधारे शोध सुरु केला असता यूट्यब वर ही हा व्हिडिओ मिळाला. यात नाशिक फाटा अंगावर येतो काटा असे म्हटले होते. हा व्हिडिओ 24 नोव्हेंबर रोजी अपलोड करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की हा अपघात 23 नोव्हेंबर रोजी घडला आहे.
 
 
 
 
 
याशिवाय आम्हाला युट्यूबवर आणखी एक व्हिडिओ मिळाला. यातही दुर्घटनेचे ठिकाण नाशिकफाटा, कासारवाडी (पुणे) असल्याचे म्हटले आहे.
 
 
 
 
मात्र आम्हाला मुख्य प्रवाहाती माध्यमांमध्ये ही बातमी आढळून आली नाही. किंवा कोणत्याही वर्तमानपत्राच ही बातमी छापून आली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही दुघर्टना कोणत्या ठिकाणची आहे याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओमधून काही स्क्रिनशाॅट्स काढले आणि गूगल रिव्हर्स इमेजच्या आधारे शोध घेतला आम्हाला हैद्राबाद मधील साइब्राबाद पोलिसांचे ट्विट आढळून आले. यात या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यात आले होते.
 
 
 
या आधी एएनआय या वृत्तसंस्थेने देखील याची बातमी व दुसरे सीसीटीव्ही फुटेज शेअर केले होते.
 
 
 
याशिवाय आम्हाला न्यूज18 लोकमत च्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेली बातमीही आढळून आली. यात म्हटले आहे कीही घटना हैदराबादच्या गचीबोली येथे घडली. येथे नुकत्याच एका बायोडायवर्सिटी फ्लायओव्हरचे उद्धाटन करण्यात आले होते. याच फ्लायओव्हरवरून एका गाडी हवेत उडत थेट जमीनीवर आदळली. या अपघातामध्ये फ्लायओव्हरवरून गाडी खाली पडून तब्बल सहा जण जखमी झाले आहेत. तर, एका महिलेचा या अपघातात मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी एक वाजता घडला. जवळच्या सीसीटीव्हीमध्ये हा भयानक व्हिडीओ कैद झाला.
 
 
 
याशिवाय टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिन्याच्या वेबसाईटवर देखील ही बातमी प्रसिद्ध झाली होती. यात ही ही दुर्घटना हैद्राबादमधील गचीबोली परिसरात घडल्याचे म्हटले आहे.
 
 
 
यावरुन स्पष्ट होते की दुर्घटना पुणे येथील नाशिक फाटा फ्लायओव्हरवरची नसून हैद्राबादमधील गचीबोली परिसरात नव्याने बांधलेल्या बायोडायवर्सिटी फ्लायओव्हरवर घडली आहे. सोशल मिडियात चुकीच्या दाव्याने हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 
 
Tools Used 
 
  • Twitter Advanced Search
  • Youtube Search
  • Google Keyword Search 
  • Google Reverse Image
 
Result- Misleading
 

(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular