Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeMarathi बंगळुरु पोलिसांनी रामचंद्र गुहा यांना ठोसा लगावण्याची दिली नाही धमकी, व्हायरल झाला खोटा...

 बंगळुरु पोलिसांनी रामचंद्र गुहा यांना ठोसा लगावण्याची दिली नाही धमकी, व्हायरल झाला खोटा दावा 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim- 
 
सीएएच्या विरोधात आंदोलन करणारे इतिहासकार रामचंद्र गुहा यांना पोलिसाने दिली ठोसा लगावण्याची धमकी 
 
Verification- 
 
कॉंग्रेसचे खासदार आणि माजी मंत्री शशी थरूर यांनी ट्विट करुन म्हटले आहे की हा पोलिस कर्मचारी रामचंद्र गुहा यांना आपल्या मुठीने जिवे मारण्याची धमकी देत आहे? निषेधासाठी लोकशाही अधिकाराचा वापर करणा-या ज्येष्ठ इतिहासकारांना अटक करणे इतके वाईट आहे. परंतु असे करणे अपमानास्पद आहे आणि पोलिस कठोर शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र आहेत. गृहमंत्र्यांना काळजी आहे का ?

19 डिसेंबर रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात देशव्यापी निदर्शने झाली. देशभरात लोक रस्त्यावर उतरले, बहुतेक राज्यांमध्ये पोलिसांनी निषेध करण्यास परवानगी नाकारली आणि कलम 144 लागू केले. बेंगळुरू येथे आंदोलकांमध्ये कर्नाटकचे इतिहासकार रामचंद्र गुहा देखील सामील झाले, पोलिसांनी त्यांना आणि इतर लोकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी गुहा यांना ताब्यात घेतल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिए शेअर करुन  खासदार शशी थरूर यांच्यासह अनेकांनी हे सांगितले की एका पोलिसाने गुहा यांना ठोसे मारण्याची धमकी दिली होती.
 
आम्ही गुहा यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईचा संदर्भात आणि व्हायरल व्हिडिओ संदर्भात पडताळणी करण्याचे ठरवले. शोध सुरु केला असता आम्हाला याच दाव्याचे अनेक टविट्स आढळून आले.
 
इंडियन एक्सप्रेसच्या यूट्यूब चॅनलवर देखील हा व्हायरल व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे पण यात कुठेही पोलिसांनी रामचंद्र गुहा यांना ठोस लगावण्याचा उल्लेख आढळून आला नाही. 
 
एक पोलिस कर्मचारी गुहा यांना हे आंदोलन चुकीचे आहे हे हाताला धरुन सांगत असल्याचे दिसून येते त्याचवेळी दुसरा पोलिस कर्मचारी गुहा यांच्या समोर येतो त्याच्या पाठीमागे कॅमेरा असल्याने कॅमे-यात तो गुहांकडे काही सेंकदांसाठी मुठ पुढे करत असल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ स्लो मोशनमध्ये पाहिला असता पोलिस कर्मचा-याने आपल्या हाताची मुठ गुहा यांच्याकडे नेली नव्हती तर छातीवर असलेल्या खिशाकडे नेल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे अधिक गती व्हिडिओ सुरु असल्याने कर्मचारी गुहांना ठेस लगावण्याच्या भुमिकेत असल्याचा आपल्याला भास होतो. मात्र तो भ्रम आहे.
 
यावरुन हेच स्पष्ट होते की पोलिस कर्मचा-याने रामचंद्र गुहा यांना ठोसा लगावण्यासाठी मुठ पुढे केली नव्हती तर आपल्या खिशाकडे हात नेला होता. सोशल मीडियात हा व्हिडिओ चुकीच्या दाव्यानिशी व्हायरल झाला आहे. 
 
Tools Used 
 
Twitter Advanced Search 
Google Search 
 
Result- Misleading
 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular