Thursday, December 26, 2024
Thursday, December 26, 2024

HomeMarathiसरकार कोसळल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मजारवर चादर चढविली ? वाचा...

सरकार कोसळल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मजारवर चादर चढविली ? वाचा काय आहे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim- 

पराभूत झाल्याने भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मजारवर चादर चढवण्यासाठी गेले. राहुल गांधीच्या वेळी भुंकणारे लोक आता कुठे गेले. 

Screenshot-2019-11-30-at-7.26.58-PM.jpg
 
Verification-
 
सोशल मिडियात सध्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मजारवर चादर चढवतानाचा आणि माथा टेकल्याचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोसंबंधी दावा करण्यात येत आहे की, निवडणुकीत पराभुत झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मजारवर चादर चढवली. 
 
आम्ही सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या या दाव्यासंबंधी पडताळणी करण्याचे ठरविले. गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने या व्हायरल फोटोंचा शोध घेतला असता इंडियन एक्सप्रेसची जानेवारी 2015 मधील एक बातमी आढळून आली यात हा फोटो छापण्यात आला आहे. या बातमीनुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाऊद  बोहरी समाजाचाचे धर्मगुरू डाॅक्टर सैयदना मोहम्मद बुरहान्नुदीन यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी गेले होते. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोहरा समाजाचे प्रमुख सैयदना मकद्दुल सैफुद्दीन यांच्याशी बातचीत देखील केली होती. शिवाय त्यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर देखील याची माहिती दिली होती.
 
यावरुन हे स्पष्ट होते की देवेंद्र फडणवीस यांचा चार वर्षापूर्वीचे फोटो चुकीच्या दाव्यानिशी व्हायरल करुन भ्रामकता पसरवली जात आहे. 
 
Tools Used 
 
  • Google keywords Search 
  • Google Reverse image Search 
 
Result- Misleading
 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular