Saturday, July 27, 2024
Saturday, July 27, 2024

HomeMarathiABVP ने NRC, CAB आणि CAA विरोधात आंदोलन केले नाही. माॅर्फ फोटो...

ABVP ने NRC, CAB आणि CAA विरोधात आंदोलन केले नाही. माॅर्फ फोटो झाला व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim

आसाममध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य NRC, CAB आणि CAA चा विरोध करत आहेत. देश बदलतोय 2020

Verification
सोशल मीडियात सध्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनाचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोसंबंधी दावा करण्यात येत आहे की आसाममध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य NRC, CAB आणि CAA चा विरोध करत आहेत. देश बदलतोय 2020. या फोटोमध्ये एबीव्हीपीचे बोर्ड हातात घेऊन उभे असलेले तरुण आणि तरुणींनी एक बॅनर हातात घेतला असून त्यावर इंग्रजीत आम्हाला एनआरसी सीएबी सीएए नको, मोदी परत जा असा मजकूर लिहिण्यात आला आहे. या मजकूराखाली पिवळ्या अक्षरांत एबीव्हीपी आसाम असे लिहिले आहे.
आम्ही या संदर्भात काही माहिती मिळते आहे का हे तपासून पाहिले असता आम्हाला हाच दावा असणारे काही ट्विटस आढळून आले.
या व्हायरल फोटोबद्दल काही माहिती मिळतेय का हे पाहण्यासाठी आम्ही गूगल रिव्हर्स इमेजचा शोध घेतला असता आम्हाला DNAया इंग्रजी वेबसाईटवर वरील बातमीत फोटो आढळून आला मात्र ही बातमी एनआरसी सीएए समर्थनाची होती. शिवाय फोटोवर देखील समर्थनच लिहिले होते.यात कुठेही विरोध केल्याचे दिसत नाही. बातमीत दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादमध्ये 18 डिसेंबर 2019 रोजी एबीव्हीपीचे कार्यकर्त्यांनी नव्या नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चात घेतला.
Deccanherald या वेबसाईटवर मात्र हा फोटो जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधील असल्याचे म्हटले आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एनआरसी समर्थनार्थ केलेल्या आंदोलनाचा फोटो एडिट करुन सोशल मीडियात भ्रामक दाव्याने व्हायरल करण्यात आला आहे.
Tools Used 
Twitter Advanced Search
Google Search
Result- False 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular