Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeMarathiहैद्राबादमधील युवतीच्या निर्घृण हत्येमागे आहे धार्मिक आंगल? वाचा व्हायरल दाव्याचे सत्य

हैद्राबादमधील युवतीच्या निर्घृण हत्येमागे आहे धार्मिक आंगल? वाचा व्हायरल दाव्याचे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim
 
जब भी इस्लामिक कट्टर पंथ की बात करो उसके खिलाफ आवाज़ उठाओ तो हिन्दू मुस्लिम एकता की दुहाई देने वालों तुमने अपने आपको महान और बुद्धजीवि साबित करने के लिए आज एक और बेटी की बलि चढ़ा दी।  

 

 
मराठी अनुवाद– 
 
कधी इस्लामिक कट्टरपंथाविरोधात आवाज उठवला गेला तर हिंदू मुस्लिम एकतेची हाक देणा-यानों तुम्ही स्वत: ला महान आणि बुद्धजीवी आहात हे पटवून देण्यासाठी आज आणखी एका मुलीचा बळी दिला. 
 
 
 
 
Verification-
 
 
 
हैद्राबादमधील शादनगर परिसरात 27 नोव्हेंबर रोजी एका 27 वर्षीय पशुचिकित्सक युवतीला सामुहिक बलात्कार केल्यानंतर जाळून मारण्यात आले. सोशल मीडियात या घटनेचा तीव्र विरोध करण्यात आला. तर काही लोकांनी याला धार्मिक रंग देऊन ही पोस्ट व्हायरल केली.  पोस्ट शेअर करणा-या युजर्सचा दावा आहे कि युवतीवर सामुहिक बलात्कार आणि हत्या करणारे मुस्लिम धर्मीय आहेत. यासोबतच प्रियंका रेड्डी नावाच्या या युवतीसाठी ट्विटर वर  #RIPPriyankaReddy ट्रेंड होऊ लागला. 
 
 
 
 
आम्ही सोशल मिडियात व्हायरल होत असलेल्या धार्मिकतेच्या दाव्याची पडताळणी करण्यास सुरवात केली असता तेलगू भाषेतील न्यूज 18 ची बातमी आढळून आली.
 
याशिवाय newindianexpress नावाच्या इंग्रजी वेबसाईटवर याबाबतची सविस्तर बातमी मिळाली. पशुचिकित्सक प्रियका रेड्डीची ड्यूटी बुधवारी गच्ची बाऊली या परिसरात होती. याच कारणास्तव तिला आपली स्कुटी शादनगर टोल प्लाझा शमसाबाद जवळ पार्क करुन कॅब करुन जावे लागले . पण जेव्हा ती रात्री माघारी आपल्या स्कुटीजवळ आली तेव्हा स्कुटी पंक्चर असल्याचे तिला दिसले. तिने याची माहिती आपली बहिणी पी भाव्या रेड्डी हिला दिली. शिवाय तिली येथे काही लोक आणि लोडिंग ट्रक दिसत असल्याने भिती वाटत असल्याचे फोनवर सांगितले. बहिणीने तिला स्कुटी तिथेच पार्क करुन कॅबने घरी येण्यास सांगितले. पण तिने सांगितले की काही लोक तिची मदत करत आहेत ती थोड्या वेळातच परत करेल. मात्र यानंतर प्रियंकाचा मोबाइल स्विचआॅफ झाला. रात्री उशिरापर्यंत प्रियंका घरी न आल्याने घरच्या लोकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी याची सूचना जवळच्या सगळ्या पोलिस स्टेशनमध्ये दिली. तपास सुरु झाल्यानंतर टोल प्लाझा पासून 30 किमी अंतरावर एका शेतात जळालेला मृतदेह आढळून आला. प्रियंकाच्या नातेवाईकांनी तो मृतदेह ओळखला। पोलिसांनी सांगितले आहे की प्रकरणाचा तपास सुरू आहे, आरोपींची नावे अजून समोर आलेली नाहीत.
 
 
 
याशिवाय आम्हाला India tv नावाच्या वेबसाईटवर देखील ही बातमी मिळाली. याबातमीत म्हटले आहे की प्रियंकाची स्कूटी अज्ञान व्यक्तीने पंक्चर केली होती. पोलिसांनी या प्रकरणात एक ट्रक ड्रायव्हर आणि एका सफाई कामगाराला ताब्यात घेतले आहे. पण दोघांची नावे कळालेली नाहीत.
 
 
Newschecker.in टीम ने हैद्राबादमधील स्थानिक पत्रकारांशी देखील संपर्क साधला असता त्यांनी देखील या प्रकरणात धार्मिक अॅंगल नसल्याचे सांगितले. हैद्राबाद पोलिसांचा तपास सुरु आहे. या प्रकरणाची नवीन माहिती मिळताच आम्ही आमचा लेख अपडेट करु. 
 
Tools Used 
 
 
  • Google Search 
  • Phone Verification 
 
Result- Misleading 
 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular