Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeMarathiजामिया मिलिया विद्यापीठात पोलिसांसोबत नव्हते गुंड, सोशल मीडियात व्हायरल झाला भ्रामक दावा

जामिया मिलिया विद्यापीठात पोलिसांसोबत नव्हते गुंड, सोशल मीडियात व्हायरल झाला भ्रामक दावा

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Calim

जामिया यूनिवर्सिटीच्या विद्यार्थ्यांवर हल्ला करणारे दिल्ली पोलिसमच नव्हते तर भाजपाचे पाळलेले गुंडही होते जे आता उघडे होत आहेत…

Verification
 
दिल्लीच्या जामिया मिलिया संस्थानात सीएएस विरोधात विद्यार्थ्यानी सुरु केलेल्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. आंदोलनादरम्यान जीन्स आणि हेल्मेट घातलेल्या पोलिस शिपायाचा फोटो शेअर करुन काही लोकांनी दिल्ली पोलिसांना हा व्यक्ती नेमका कोण आहे हा प्रश्न देखील विचारला तर काही लोकांनी भाजपाचे पाळलेले गुंड देखील पोलिसांसोबत विद्यार्थ्यांना मारहाण करत होते असा आरोप केला. 
सोशल मीडियात हा फोटो अनेक प्रसिद्ध लोकांनी शेअर केला. हा फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असल्याने आम्ही या फोटोची पडताळणी करण्यास सुरवात केली. यावेळी आम्हाला फेसबुक वर हा फोटो वायरल होत असल्याचे दिसून आले. 
 
तसेच राष्ट्रवादीचे नेते डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी देखील हा फोटो ट्विटर वर शेअर केला आहे 
 
दिल्ली पोलिसांचे असे वागणे यावेळी अस प्रासंगिक वाटले त्यामुळे आम्ही या फोटोची सत्यता तपासणी करण्याचे ठरवले. आम्ही पहिल्यांदा फेसबुक वर भरत शर्मा नावाच्या युवकाचे अकाउंट शोधले. असता आम्हाला ते फोटो सहित मिळाले. 
 
पण आम्हाला त्याच्या या अकाउंटमध्ये तो आरएसएस किवां एबीव्हीपीशी संबंधित असल्याची कोणतीही माहिती मिळाली नाही. तसेच बारकाईने पाहिल्यास फेसबुकवरील व्यक्ती आणि व्हायरल फोटोतील व्यक्तीत कोणतेही साधर्म्य आढळत नाही, याबाबत दक्षिण पूर्व दिल्लीचे पोलीस उपायुक्त चिन्मय बिस्वाल यांनी समाजमाध्यमातील भरत शर्मा या प्रोफाईलचा या कॉन्स्टेबलशी कोणताही संबंध नसल्याचे ट्विट करुन सांगितले. 
 
त्यांनी केलेला पूर्ण खुलासा देखील तुम्ही पाहू शकता. 
 
याबाबत एएनआय ने देखील बातमी दिली होती
 
याशिवाय ज्याला एबीव्हीपी किंवा भाजपाचा पाळलेला गुंड असे समजले जात होते त्या अरविंद कुमार नावाच्या पोलिस कर्मचा-याने देखील खुलासा केला होता. त्याने सांगितले की त्या घटनेच्या वेळी मी साध्या वेशात होतो. मला माझ्याबद्दल समाजमाध्यमात चुकीची माहिती पसरत असल्याचे आज सकाळी समजले. मी सुर्या हॉटेलजवळ थांबलेलो असताना काही जणांनी माझे छायाचित्र घेतले होते.
Screenshot 2019-12-18 at 5.58.44 PM.png
 
यावरुन हेच स्पष्ट होते की  जामिया मिलियातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर साध्या वेशात लाठीमार करणारी व्यक्ती ही भाजपाचा गुंड किंवा एबीव्हीपी कायकर्ता नव्हे तर दिल्ली पोलिस दलातील कर्मचारी अरविंद कुमार आहे. सोशल मिडियात चुकीच्या माहितीनिशी हा फोटो व्हायरल होत आहे. 
 
Tools Used 
 
  • Google Search
  • Facebook Search 
  • Twitter Advanced Search 
 
Result- False 
 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular