दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात गडकरी आंदोलन करण्यास सर्वांना संविधानिक अधिकार आहे असे सांगत आहेत. त्याच्यासोबत सध्याचे रविशंकर प्रसाद देखील दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओसंबंधी पोस्टमध्ये म्हटले आहे की, भाजपच्या सर्व आमदार खासदार, मंत्र्यांची अवस्था पण फार वाईट झालीय. भाजपच्या कुठल्याच नेत्याला स्वतःच मत मांडण्याचा अधिकार नाही, मंत्र्यांना कुठला डिसीजन घ्यायचा अधिकार नाही. वरून अंबानीकडून आदेश येतो आणि मोदी त्याचं ऐकून डिसीजन घेतात त्यामुळं भाजपचे नेते पण वैतागले आहेत.
मागील 70 दिवसांपासून दिल्लीच्या सिंघु सीमेवर देशभरातील शेतकरी नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. सरकारने चर्चा तसेच पोलिस बळाचा वापर करुन आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न केला. दिल्लीत 26 जानेवारी रोज ट्रॅक्टर परेडदरम्यान उसळेल्या हिंसाचारामुळे काही संघटनांनी माघार घेतली त्यात मात्र राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलन सुरु असून ते बंद व्हावे म्हणून सरकार प्रयत्न करत आहेत. यात पोलिस बळाचा वापर केला शिवाय दिल्लीच्या सीमेवर भिंती बांधण्यात आल्या तसेच रस्त्यांवर खिळे देखील रोवले गेले. यानंतर नितीन गडकरी यांचा आंदोलन करण्याच्या अधिकाराबाबत भाष्य करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Fact Check / Verification
सध्याच्या शेतकरी आंदोलनावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नेंद्र मोदींवर खरंच माध्यमांसमोर टिका केली का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. काही किवर्डस तसेच काही Google Reverse Image च्या साहाय्याने शोध घेण्यास सुरुवात केली असता आम्हाला हा व्हिडिओ 10 वर्षांपुर्वीचा असल्याचा आढळू आले. भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर 15 ऑगस्ट 2011 रोजी व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.
या व्हिडिओत गडकरी सुरुवातीच्या काही सेकंदात हे स्पष्ट करतात की, भ्रष्टाराविरोधात आंदोलन करण्याचा अधिकार हा संविधानिक आहे तो काॅंग्रेस पार्टी किंवा पंतप्रधानांनी जनतेला दिलेला नाही. यावरुन हे स्पष्ट होते की गडकरी यांनी त्यावेळी काॅंग्रेसला टारगेट केले होते.
आम्ही या व्हिडिओ संदर्भात आणि गडकरींच्या पत्रकार परिषदेबाबत अधिक माहिती घेतली असता आम्हाला असे आढळून आले की, 16 ऑगस्ट 2011 रोजी अण्णा हजारे लोकपाल बिलासाठी दिल्लीत उपोषणास बसणार होते. त्याआधी 15 ऑगस्टच्या भाषाणात तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यास विरोध दर्शविला होता. सिंग यांच्या वक्तव्यानंतर नितिन गडकरी यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली होती.
काय म्हणाले होते मनमोहन सिंग?
लाल किल्ल्यावर 15 आॅगस्ट 2011 रोजी केलेल्या भाषणात मनमोहन सिंग म्हणाले होते की, लोकपाल बिलाविषयी ज्यांना तक्रार आहे त्यांनी ती संसदेसमोर किंवा एखाद्या राजकीय पक्षाकडे किंवा माध्यमांकडे मांडावी. त्यांच्या मागणीसाठी असे उपोषण आंदोलन करणे योग्य नाही. हिंदुस्तान टाईम्सने बातमी देखील दिली होती.

मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर खूप टिका झाली होती. यात मनमोहन सिंगाना उद्देश्यून माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली होती. ती सध्या शेतकरी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वक्तव्य केले या दाव्याने व्हायरल होत आहे.
Conclusion
यावरुन हे स्पष्ट होते की, यावरुन हेच स्पष्ट होते की नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात शेतकरी आंदोलनावरुन वक्तव्य केलेले नाही, तर काॅंग्रेसच्या काळात अन्ना हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनावर मनमोहन सिंह यांनी टिका केली होती त्यावेळी गडकरींनी प्रत्युत्तर दिले होते.
Result- Misleading
Our Sources
भाजपा- https://www.youtube.com/watch?v=brvzZwOEP6A
हिंदुस्तान टाईम्स- https://www.hindustantimes.com/delhi-news/pm-decries-hunger-strikes-as-means-for-ending-corruption/story-sd7Xi6XYV3EuDEntgyELwJ.html
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.