Friday, December 20, 2024
Friday, December 20, 2024

HomeMarathiयुवकाचे मुंडण करणा-या शिवसैनिकांविरोधात पोलिसांनी खरंच एफआयआर दाखल केला नाही? जाणून घ्या...

युवकाचे मुंडण करणा-या शिवसैनिकांविरोधात पोलिसांनी खरंच एफआयआर दाखल केला नाही? जाणून घ्या काय आहे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim

 

हिरामन तिवारी ने उद्धब ठाकरे के CAA पर दिए बयान का सोशल मीडिया पर विरोध किया तो शिव सैनिको ने उसको घर से उठाया –मार पीट किया और उसके सिर के बालों का मुंडन करवाया। पुलिस ने FIR तक नही लिखी।

 
मराठी अनुवाद- हिरामण तिवारीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सीएएसबद्दल केलेल्या वक्तव्याचा सोशल मिडियात विरोध केला असता शिवसैनिकांनी त्याला घरातून बाहेर काढून मारहाण केली,त्याचे मुंडन देखील केली पण पोलिसांनी साधी एफआयआर देखील लिहिली नाही.
 
 
 
Verification
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनआरसी आणि सीएए च्या आंदोलनाची तुलना जालिया बाग कांडाशी केली होती. यानंतर सोशल मीडियात हिरामण तिवारी नावाच्या युवकाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. यानंतर शिवसैनिकांनी त्याचे मुंडन केले त्याला मारहाण केली होती. मात्र यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांवर कोणतीच कारवाई केली नसल्याचा हा मॅसेज सध्या सोशल मिडियात व्हायरल होत आहे. आम्हाला  व्हाट्सअॅप आणि ट्विटर वर हा मॅसेज आढळून आला.
 
 
व्हायरल होत असलेल्या मॅसेजची आम्ही सत्यता तपासून पाहण्याचे ठरवले. याबाबत हिरामण तिवारीला शिवसैनिकांनी मारहाण करून मुंडन केले का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही किवर्ड्सच्या मदतीने आम्ही याबाबात शोध घेतला  आम्हाला थोडक्यात नावाच्या वेबसाईटवर ही बातमी आढळून आली.  यात म्हटले आहे की हिरामणी तिवारी या युवकाने ही फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याची माहिती मिळताच शिवसैनिक संतापले. पोस्ट करणाऱ्या तरुणाचं घर शोधून त्याला चांगली समज दिली. मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याबाबत शिवसैनिकांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याचे मुंडण केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात झालेल्या आंदोलनानंतर टीका केली होती.
 
 
या घटनेनंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हिरामण तिवारी या युवकाची घरी जाऊन भेट घेतली होती. सोमय्या यांनी या मारहाणीचा निषेध केला आहे. सोमय्या यांनी आज वडाळा येथे जाऊन तिवारी कुटुंबीयांची भेट घेतली. तसंच, तिवारी कुटुंबीयांना सुरक्षेची हमी दिली. त्याचबरोबर त्यांनी वडाळा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी चर्चा केली व संबंधितांच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर वृत्तवाहिन्यांशी बोलताना सोमय्या यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेचे गुंड सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवत आहेत. मात्र, पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. हिरामणला जाहीरपणे मारहाण झाली आहे. मारहाण करणारे टीव्हीवर स्पष्ट दिसत आहेत. असं असूनही काहीही कारवाई होत नाही. पोलीस नौटंकी करत आहेत,’ असंही सोमय्या म्हणाले. सौमय्या यांचा व्हिडिओ  महाराष्ट्र टाईम्सच्या ट्विटर हॅंडलवर अपलोड करण्यात आला आहे. 
 
 
आम्ही याबाबत शोध सुरू ठेवला असता आम्हाला हिंदी वृत्तववाहिनी आज तक च्या वेबसाईटवर बातमी मिळाली. या बातमीत म्हटले आहे की चार शिवसैनिकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 
 
याशिवाय मारहाण झालेल्या तरुणाने देखील ट्विट करुन स्वत: ही माहिती दिली आहे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की- 
 
राष्ट्रवादी लोकांचे अभिनंदन!

त्या शिवसेना गुंडांवर गुन्हा दाखल!

 
मी एकटा असताना आपण लोकांनी मला साथ दिली! आता मी एकटा नाही!

चला एकत्र लढू!

 
 
यावरुन हेच स्पष्ट होते की शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास चालू आहे. सोशल मीडियात खोटी माहिती पसरवली जात आहे. 
 
 
Tools Used 
 
Google Search 
Twitter Advanced Search 
 
Result- Fake 
 
 

(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular