Friday, June 14, 2024
Friday, June 14, 2024

HomeFact CheckPoliticsसंविधानाच्या अनुच्छेद ३३० आणि ३४२ नुसार, भारतातील एससी/एसटी/ओबीसी खरंच हिंदू नाहीत ?...

संविधानाच्या अनुच्छेद ३३० आणि ३४२ नुसार, भारतातील एससी/एसटी/ओबीसी खरंच हिंदू नाहीत ? जाणून घ्या सत्य काय आहे

(याची तथ्य पडताळणी आधी हिंदीमध्ये केली आहे)

Claim

सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की, संविधानाच्या अनुच्छेद ३३० आणि ३४२ नुसार, भारतातील एससी/एसटी/ओबीसी हे हिंदू नाहीत तर भारताचे मूळ निवासी आहे. 

फोटो साभार : Facebook/Krishna Varmora

Fact

व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही गुगलवर ‘भारतीय संविधान’ असे सर्च करून शोधले. त्यावेळी आम्हांला विविध संकेतस्थळावर भारतीय संविधानाची पीडीएफ फाईल मिळाली. 

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३० मध्ये असं काहीच लिहिलेले नाहीये की, एससी/एसटी/ओबीसी हे हिंदू नाहीत. अनुच्छेद ३३० मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधून येणाऱ्या व्यक्तींच्या आरक्षणाबद्दल माहिती दिली आहे.

पडताळणी करत असतांना आम्हांला आढळले की, अनुच्छेद ३४२ हे अनुसूचित जनजातीच्या विशेष तरतुदी संदर्भात आहे. त्यात कुठेही असं लिहिलं नाहीये की, भारतातील एससी/ एसटी/ओबीसी हे हिंदू नाहीये. २०२० मध्ये आमच्या टीमने या दाव्याची तथ्य पडताळणी केली होती. 

या व्यतिरिक्त आम्ही सुप्रीम कोर्टाचे वकील आणि संविधानाचे जाणकार अनुराग ओझा यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी सांगितले,”व्हायरल दाव्यात तथ्य असलेल्या गोष्टींना तोडून मोडून सांगितले आहे. संविधानात असे कुठेही लिहिले नाही की, अनुच्छेद ३३० आणि ३४२ नुसार, भारतातील एससी/एसटी/ओबीसी हे हिंदू नाहीत.”

Result : Fabricated Content/False

जर तुम्हाला माझी तथ्य पडताळणी आवडत असेल तर असेच विविध लेख तुम्ही या दुव्यावर टिचकी मारून वाचू शकता.


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular