देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रावर 67100000 कोटींचे कर्ज सोडून गेले तर रघुबरदास दास झारखंडवर 85000 कोटींचे कर्ज करुन पायउतार झाले आहेत. विचार करा मोदीजी जर सत्तेतून बाहेर पडले तर त्यावेळी किती कर्ज करून जातील.
Verification-
नुकताच महाराष्ट्र आणि झारखंड मध्ये सत्ताबदल झाला आहे. ट्विटरवर लालू प्रसाद यादव यांच्या पॅरोडी अकाउंटवर या दोन राज्यांवर असलेल्या कर्जाचा आकडा जाहीर करण्यात आला आहे. याबाबत ट्विटमध्ये म्हटले आहे की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रावर 67100000 कोटींचे कर्ज सोडून पायउतार झाले तर भाजपाचे रघुबर दास हे देखील झारखंडवर 85000 हजार कोटींचे कर्ज सोडून गेले आहेत. महाराष्ट्र आर्थिक राजधानी आहे तर झारखंड खनिज संपत्तीत धनी राज्य आहे. या राज्यांची ही परिस्थिती आहे, आता जरा विचार करा ज्या दिवशी मोदीजी सत्तेतून बाहेर पडतील त्यावेळी किती कर्जात बुडवून जातील ?
ट्विटमध्ये केलेल्या दाव्यात किती तथ्य आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी काही किवर्ड्सच्या आधारे महाराष्ट्रावर सध्या किती कर्ज आहे याचा गूगलवर शोध घेतला. आम्हाला या संदर्भात अनेक बातम्या आढळून आल्या.
महाराष्ट्रावर सध्या असलेल्या कर्जाची माहिती मिळवताना आम्हाला माजी मुख्मयंत्री देवेंंद्र फडणवीस यांच्या काळात किती कर्ज वाढले आणि सध्या कर्ज किती आहे याची माहिती
दैनिक सकाळ च्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीत आढळून आली. या बातमीत महाराष्ट्रावर सध्या पावणेपाच लाख कोटींचे कर्ज असल्याचे म्हटले आहे.
याशिवाय महाराष्ट्र टाईम्समध्ये देखील देवेंद्र फड़णवीस यांचा कार्यकाल संपत असतानाची बातमीची छापून आली होती या बातमीत म्हटले आहे की सन २०१४ मध्ये जेव्हा फडणवीस सरकार सत्तेत आले, त्यावेळी राज्यावर एकूण १.८ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र, जून २०१९ पर्यंत हा कर्जाचा डोंगर वाढत जात तो ४. ७१ लाख कोटी रुपये इतका झाला आहे. या व्यतिरिक्त फडणवीस सरकारने सुमारे ४३ हजार कोटी रुपयांच्या योजनांसाठी बँकेची हमी दिलेली आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रावर 67100000 कोटींचे कर्ज ठेवून नाहीतर पावणे पाच लाख कोटींचे कर्ज ठेवून पायउतार झाले आहेत. त्यामुळे ट्विटमध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत केलेला दावा चुकीचा असल्याचे आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले. यानंतर आम्ही झारखंडवर किती कर्ज आहे याचा शोध घेतला असता आम्हाला काही बजेटच्या आधीच्या काही बातम्या आढळून आल्या. दैनिक
प्रभात खबर या वेबसाईटवर बजेटच्या बरोबरीने म्हणजेच 85234 कोटींचे कर्ज झारखंड वर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या 2019- 20 च्या बजेटच्या वेळी कर्जाचा आकडा बजेटपेक्षा जास्त होणार असल्याचा अंदाजही यात वर्तविण्यात आला आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की ट्विटमध्ये झारखंच्या कर्जाबद्दल केलेला दावा काही प्रमाणात खरा असला तरी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेला दावा हा पूर्णपणे चुकीचा आहे. सोशल मीडियात हा मॅसेज व्हायरल झाल्याने चुकीची माहिती पसरत आहे.
Tools Used
Google Keywords Search
Twitter Advanced Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)