Sunday, July 21, 2024
Sunday, July 21, 2024

HomeFact CheckWeekly Wrap : अहमद पटेल यांची अंत्ययात्रा ते शेतकरी आंदोलनास निघालेल्या महिलांचा...

Weekly Wrap : अहमद पटेल यांची अंत्ययात्रा ते शेतकरी आंदोलनास निघालेल्या महिलांचा फोटो

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या अंत्ययात्रेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला तर दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचे काही फोटो व्हायरल झाले. याशिवाय इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप-5 फेक न्यूज वाचू शकता.

व्हायरल व्हिडिओ काॅंग्रेस नेते अहमद पटेल यांच्या अंत्ययात्रेचा असल्याचा दावा व्हायरल

काॅंग्रेस नेते अहमद पटेल यांच्या अंत्ययात्रेला हजारो लोक उपस्थित असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की हा व्हिडिओ अहमद पटेल यांच्याच अंत्ययात्रेच्या असून ते कोरोना पाॅझिटिव्ह होते, तरी देखील त्यांच्या अंत्ययात्रेत कोणत्याही नियमाचे पालन करण्यात आले नाही. पण हे सत्य नाही. हा व्हिडिओ पटेल यांच्या अंत्ययात्रेचा नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

व्हायरल फोटो दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा असल्याचा दावा

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात रात्रीच्या वेळी हजारो शेतकरी रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेले दिसत आहे. दावा करण्यात येत आहे की, पंजाब हरियाणामधून आलेल्या शेतक-यांनी दिल्लीजवळ असा ठिय्या दिला आहे.  पण हे सत्य नाही. व्हारल फोटो दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा नसून दोन वर्षापूर्वी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने नाशिक ते मुंबईपर्यंत काढलेल्या मोर्चाचा ठाणे येथील आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शेतकरीविरोधी विधान केल्याचा दावा व्हायरल

शेतक-यांना मरायचे असेल तर मरु द्या… शेतक-यांसाठी कितीही करा… त्याला कमीच वाटते… दर दिवसाला कोणी न कोणी शेतकरी आत्महत्या करतो, सरकार प्रत्येकाकडे लक्ष देत फिरेल का? शेती संबंधी एका कार्यक्रमात बोलताना संजय धोत्रे यांनी असे विधान केले असल्याचे या बातमीत म्हटले आहे. पण हे सत्य नाही, संजय धोत्रे यांनी याबाबत खुलासा केला होता. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

रिझर्व बॅंकेने दोन हजाराच्या नोटांचा पुरवठा बंद केल्याचा दावा व्हायरल 

रिझर्व बॅंकेने दोन हजाराच्या नोटांचा पुरवठा बंद केल्याने एटीएममध्ये या नोटा मिळत नसल्याचा दावा काही न्यूज आर्टिकल्समध्ये करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, देशातील एटीएममधून आता 2000 रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत कारण आरबीआयने छपाई बंद केली आहे. बँका देखील एटीएम मशीनमधून या दोन हजाराच्या नोटेचे कॅलिबर पैसे काढत आहेत. पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे. आरबीआयने असा निर्ण घेतलेला नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

व्हायरल फोटो दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासाठी निघालेल्या महिलांचा असल्याचा दावा

दिल्लीतील शेतकरी आंदोलनासाठी निघालेल्या महिलांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात स्वत: महिला ट्रॅक्टर चालवत निघालेल्या दिसत आहेत. दावा करण्यात येत आहे की या हरियाणातील महिला शेतकरी असून त्यांची एक तुकडी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे रवाना झाली आहे. पडताळणीत हा फोटो तीन वर्षापूर्वीचा असल्याचे आढळले. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.


Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular