लोकांनी मुस्लिम व्यक्तीची गळाभेट घेताच झाला स्फोट, यात अनेक हिंदू सेक्युलर मुलींचा बळी गेला. ज्या वाचल्या आहेत त्यांनी आता तरी सावध रहावे.
Verification–
ट्विटरवर सध्या काही फोटो व्हायरल होत आहेत या फोटोत एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला डोळ्यावर पट्टी बांधून थांबला आहे तर त्याचा जवळ असलेल्या बोर्डवर इंग्रजीत लिहिले आहे की, मी एक मुसलमान आहे मी तुमच्यावर विश्वास ठेवता, काय तुम्ही माझ्यावर एव्हढा विश्वास ठेवता का की माझी गळाभेट घेऊ शकाल ? ट्विटमध्ये म्हटले आहे की, या मुस्लिम व्यक्तीची गळाभेट घेतल्याने स्फोट झाला आणि अनेकांचा बळी गेला यात सगळ्यात जास्त हिंदू मुली मृत्युमुखी पडल्या. ज्या वाचल्या आहेत त्यांनी आता तरी सावध व्हावे.
आम्ही ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोंचे वास्तव काय आहे हे पाहण्यासाठी पडताळणी केली. यासाठी काही किवर्ड्सच्या साहाय्याने गूगलमध्ये शोध घेतला पण अशा प्रकारची कोणतीही बातमी आढळून आली नाही. यानंतर आम्ही यांडेक्सच्या साहाय्याने याचा शोध घेतला असता या फोटोबाबत अनेक रिझल्ट दिसून आले. यात आम्हाला
याशिवाय आम्हाला हिंदी वेबसाईट
लल्लनटाॅप मध्ये तीन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या लेखात हा फोटो आढळून आला. या लेखात म्हटले आहे की दोन वर्षांपूर्वी ( 2015 मध्ये) मुंबईतील चौपाटी वर एका मुस्लिम युवकाने प्रयोग केला. त्याने मुस्लिम टोपी आणि पेहराव घालून डोळ्यांवर पट्टी बांधून उभा राहिला आणि आपल्या जवळ एक बोर्ड ठेवला त्या बोर्डवर लिहिले होते- मी एक मुसलमान आहे मी तुमच्यावर विश्वास ठेवता, काय तुम्ही माझ्यावर एव्हढा विश्वास ठेवता का की माझी गळाभेट घेऊ शकाल ? या युवकाची अनेक लोकांनी गळाभेट घेतली. त्याला त्याच्या आयुष्यात एवढं प्रेम तर ईदच्या दिवशीही मिळाले नसेल, असे लेखात म्हटले आहे.
आम्ही शोध सुरुच ठेवला असता 2015 मध्ये
झी न्यूज त्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातमीत हा व्हिडिओ आढळून आला. तसेच आणखी एका यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ मिळाला.
याशिवाय
scoopwhoop.com या वेबसाईटवर देखील ही बातमी 2015 मध्ये प्रकाशित झाली होती.
कोणत्याही बातमीत लोकांनी मुस्लिम युवकाची गळाभेट घेतल्यानंतर स्फोट झाल्याचा उल्लेख नव्हता. त्यामुळे आम्ही ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या स्फोटाच्या फोटोचा शोध घेतला असता
guardian या वेबसाईटवर नायजेरियात आत्मघातकी स्फोट झाल्याची बातमी आढळून आली या बातमीत हा फोटो मिळाला.
यावरुन हेच स्पष्ट होते की मुस्लिम व्यक्तीला अलिंगन दिल्याने स्फोट झाला नाही यात लोकांचा जीव गेलेला नाही. मुंबईत 2015 मध्ये करण्यात आलेल्या एका सामाजिक प्रयोगाच्या व्हिडिओतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करुन चुकीचा दावा सध्या व्हायरल करण्यात येत आहे.
Sources
Twitter Advanced Search
Google Search
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)