Monday, June 17, 2024
Monday, June 17, 2024

HomeFact Checkपंतप्रधान मोदी शाळकरी मुलांना तीनचा पाढा म्हणून दाखवू शकले नाहीत? हे आहे...

पंतप्रधान मोदी शाळकरी मुलांना तीनचा पाढा म्हणून दाखवू शकले नाहीत? हे आहे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शाळकरी मुलांना तीनचा पाढा म्हणून दाखवू शकले नाहीत त्यांची फजिती झाली असा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. बिहार निवडणूकीत भाजपाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना उद्देश्यून एक ट्विट करण्यात आले आहे. यात पंतप्रधान शाळकरी मुलांसमोर तीनचा पाढा म्हणू शकले नाहीत या बातमीचे कात्रण शेअर कऱण्यात आले आहे व म्हटले आहे की, विरोधी पक्षनेत्यांच्या शिक्षणावर भाष्य करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षाचे पंतप्रधान, वस्त्रोद्योग मंत्री यांना तीनच्या पाढ्याविषयी विचारले असते तर बरे झाले असते.

संग्रहित

बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील जाले विधानसभा मतदार संघातील काॅंग्रेसचे उमेदवार मकशूर उस्मानींच्या बाबतीत एक दावा व्हायरल झाला आहे. यात म्हटले आहे की, मोदींच्या पाटणा रॅलीचा स्फोट घडवून आणणारा दहशतवादी आफताब आलम याला कॉंग्रेसच्या महायुतीतल्या औरई मतदार संघातून तिकीट देण्यात आलं आहे. नामांकन दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आफताबचे सासर पाकिस्तानात आहे. अलिगढ मुस्लिम युनिवर्सिटीमध्ये पाकिस्तानचे निर्माता मोहम्मद अली जीना यांचा फोटो बसविणा-या मकशूर उस्मानीला देखील काॅंग्रेसने तिकिट दिले आहे.

Fact Check/Verification

पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच शाळकरी मुलांसमोर तीनचा पाढा म्हणू शकले नाहीत का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. काही किवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला दोन वर्षापूर्वीची फेसबुक पोस्ट आढळून आली ज्यात हाच दावा करण्यात आला आहे आणि बातमीचे कात्रण देखील हेच शेअर करण्यात आले आहे.

https://www.facebook.com/MagadhUniversityMUBodhGaya/photos/a.1559512044114102/1696007970464508

यावरुन लक्षात आले की हा दावा मागील दोन वर्षांपासून सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मात्र यासंदर्भात प्रतिष्ठित माध्यमांची बातमी आढळून आली नाही. यानंतर आम्ही व्हायरल कात्रणातील बातमीत काय म्हटले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

बातमीत काय म्हटले आहे?

व्हायरल कात्रणातील बातमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शाळकरी मुलांसोबतचा फोटो छापण्यात आला आहे तसेच बातमीत म्हटले आहे की, “गुजरातमधील काठियावाड येथील एका जूनियर हायस्कूलमध्ये रोजगारपुरक शिक्षणाचे महत्व सांगण्यासाठी पोहचलेले पंतप्रधान धर्मसंकटात अडकले जेव्हा विनोदाच्या क्षणी मुलांनी त्यांना तीनचा पाढा म्हणून दाखवायला सांगितला. यावर मोदीजी टाळू लागले व इतर विषयावर बोलू लागले पण मुले जिद्द करु लागली. हे सगळे लाईव्ह प्रसारण होत होते. पतंप्रधान तीन त्रिक नऊच्या पुढे पाढा म्हणून शकले नाहीत. यानंतर मुलांनो येत नाही…येत नाही असे म्हणू लागले. यानंतर मोदीजींना त्यांच्या खाजगी सल्लागाराने सांगितले की इथून पुढे मुलांच्या कार्यक्रमात जाण्याआधी 20 पर्यंतचे पाढे पाठ करावेत.”

आम्ही व्हायरल कात्रणातील पंतप्रधान आणि शाळकरी मुलांचा फोटो नेमका कुठला आणि कधीचा आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला 5 सप्टेंबर 2021 रोजी dailymail च्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीत हा फोटो दिसून आला. यात म्हटले आहे की पंतप्रधानांनी शिक्षक दिनानिमित्त दिल्लीत शाळकरी मुलांना संबोधित केले.

याशिवाय financialexpress च्या बातमीत देखील हीच माहिती देण्यात आली आहे. कि पंतप्रधानांनी शिक्षक दिनानिमित्त देशभरातील मुलांशी संवाद साधला.

यावरुन हे सिद्ध झाले की व्हायरल फोटो गुजरातमधील काठियावाड येथील हायस्कूलमधील नसून दिल्लीत शाळकरी मुलांची मोदींनी भेट घेतली त्यावेळचा आहे. डेली मेल आणि फायनांशियरल एक्सप्रेसच्या बातमीत कुठेही पंतप्रधानांना तीनचा पाढा म्हणता आला नसल्याचा उल्लेख नाही.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की, पंतप्रधानांना मुलांनी तीनचा पाढा म्हणण्यास सांगितलेले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जुना फोटो एडिट करुन व्यंग्यात्मक बातमीचे कात्रण तयार करण्यात आले आहे. लोक तेच खरे समजून शेअर करत आहेत.

Result: False

Our Source

financialexpress- https://www.financialexpress.com/archive/modi-sir-on-teachers-day-pm-connects-his-office-to-classrooms-across-the-country/1286093/

Dailymail- https://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2745534/Im-not-headmaster-Im-taskmaster-Modi-gives-youngsters-new-chacha-schoolchildren-pack-auditoriums-listen-pioneering-address.html

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.


Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular