Monday, November 25, 2024
Monday, November 25, 2024

HomeFact CheckCrimeट्रम्प भारत दौ-यावर असताना मुस्लिम लोक दंगली करत आहेत का? जाणून घ्या...

ट्रम्प भारत दौ-यावर असताना मुस्लिम लोक दंगली करत आहेत का? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim

मुस्लिम समुदाय आणि भारतविरोधी लोक नेमके आत्ताच दंगली करत आहेत. तेही इंटरनॅशनल मीडिया देशात असताना.

Verification

@RaiSahab20 नावाच्या ट्विटर हॅंडलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात काही लोक एसटी बस ड्रायव्हरवर भर रस्त्यात हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ट्विटमध्ये दावा करण्यात आला आहे की,  हा मुस्लिम समुदाय आणि त्यांचे मॅंटर्स काॅंग्रेस आण भारत विरोधी लोक, ज्यांना भारताचे सामर्थ्य पाहवत नाही त्या सगळ्यांनी मिळून देशाला बदनाम करण्याची योग्य वेळ निवडली आहे. इंटरनॅशनल मीडिया देशात असताना हे दंगे सुरु आहेत. मोदीजी आणि अमित शाह तुम्ही सगळ्यांचा विश्वास जिंका. 

आम्हाला आणखी एक ट्विट आढळून आले यात हा व्हिडिओ शेअर करून म्हटले आहे की, सीएए एनआरसी हा तर एक बहाणा आहे काही लोकांना भारत हा सीरिया सारखा बनवायचा आहे. 

आम्ही हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे याबाबत पडताळणी करण्याचे ठरविले. गूगलमध्ये काही कीवर्डसच्या साहाय्याने आम्ही शोध घेतला असता आम्हाला एबीपी माझाच्या बातमीचा व्हिडिओ आढळून आला. यात म्हटले आहे की औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे वाहनाला ओवरटेक करु न दिल्याच्या रागातून शिरपुर- कन्नड  बस ड्रायव्हरला 10 ते 15 जणांच्या टोळक्याने मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

याशिवाय महाराष्ट्र टाईम्समध्ये देखील ही बातमी छापून आली होती. यात म्हटले आहे भर रस्त्याच ड्रायव्हरला मारहाण झाल्याने शहरात तणावाची स्थिति निर्माण झाली होती.  साम टिव्हीच्या बातमीनुसार या मारहाणीत बस चालक सुधाकर शिरसाट हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले असता हल्लेखोरांपैकी बरेचजण पळून गेले, पोलिसांनी मकबूल शहा आणि रिजवान सलीम शेख या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

यावरुन हेच स्पष्ट होते की हा हल्ला धार्मिक वादातून झालेला नसून वाहनाला साईड न देण्याचा किरकोळ वादातून झाला आहे. सोशल मीडियामध्ये चुकीच्या दाव्यानिशी हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 
Tools Used
  • Twitter Advanced Search
  • Google Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular