राखी सावंतचा पाकिस्तानी ध्वज हाती घेतलेला फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे यासोबतचे आणखी दोन फोटो देखील शेअर होत आहेत. एका फोटोत राखी पाकिस्तानी ध्वज फडकवताना दिसत आहे तर दुस-या एका फोटोत तो ध्वज तिने आपल्या शरीराला लपेटून घेतला आहे. दावा करण्यात येत आहे की जिला तुम्ही कट्टर देशभक्त समजता तिने पाकिस्तानी ध्वजासोबत फोटो काढले आहेत.

Fact Check/Verification
राखी सावंतने खरंच पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊन फोटोशूट केले आहे की याची पडताळणी सुरु केली. काही किवर्डसच्या साहाय्याने शोध सुरु केला असता आम्हाला राखीच्या पाकिस्तानी झेंड्यासोबतचा फोटो संदर्भात अनेक बातम्या दिसून आल्या.

आम्हाला महाराष्ट्र टाईम्सची 9 मे 2019 रोजीची बातमी आढळून आली. ज्यात म्हटले आहे की, बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सतत या ना त्या कारणावरून चर्चेत असते. नुकतााच तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत राखी सावंत पाकिस्तानचा झेंडा घेऊन उभी आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून राखीने तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक फोटो व्हायरल केला. या फोटोत राखी लाल रंगाचा स्कर्ट घालून, पाकिस्तानचा झेंडा अंगाला गुंडाळून नदी किनारी उभी आहे.

याशिवाय न्यूज 18 लोकमतची बातमी देखील आढळून आली.

राखी सावंत ने आपल्या इंस्टाग्राम पेजवर देखील हे फोटो शेअर करत म्हटले होते की माझे भारतावर खूप प्रेम आहे पण धारा 370 या चित्रपटात माझे हे पात्र आहे. तरीही तिच्या या फोटोंवरुन तिला खूप ट्रोल करण्यात आले.
Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की राखी सावंतने जाणून बुझून पाकिस्तानचा झेंडा हातात घेतला नव्हता तर तो एका चित्रपटातील सीन होता. त्याच सीनचा फोटो आता चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.
Result- Misleading
Sources
न्यूज 18 लोकमत- https://lokmat.news18.com/entertainment/rakhi-sawant-trolled-for-posing-with-pakistani-flag-mj-371468.html
इंस्टाग्राम- https://www.instagram.com/p/BxMf7c2FKRY/
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.