Monday, November 25, 2024
Monday, November 25, 2024

HomeCoronavirusकोरोनाव्हायरस विषयी युनिसेफच्या नावाने व्हायरल होत असलेल्या मॅसेजचे काय आहे सत्य?

कोरोनाव्हायरस विषयी युनिसेफच्या नावाने व्हायरल होत असलेल्या मॅसेजचे काय आहे सत्य?

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim- 

युनिसेफने कोरोनाव्हायरस विषयी बुलेटिन जारी केले आहे. 

 
 
 
Verification
 
सोशल मीडियामध्ये कोरोनावायरस सदंर्भात यूनिसेफच्या नावाने एक मॅसेज व्हायरल होत आहे. यात कोरोना व्हायरसपासून काय काळजी घ्यावी या संदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. हा मॅसेज इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये अनेक सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहे.
 
 
आम्ही वायरल पोस्टमधील दाव्यामंध्ये किती तथ्य आहे याची पडताळणी करण्याचे ठरवले. 
आम्ही जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसपासून बचावासाठी काय काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेतले.  व्हायरल पोस्टमधील दावे असे आहेत.
दावा 1- कोरोना विषाणू आकारात मोठा असतो जेथे पेशीचा व्यास 400-500 मायक्रो असतो आणि म्हणूनच कोणताही मास्क त्याच्या प्रवेशास प्रतिबंधित करते. 
उत्तर- जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या म्हणण्यानुसार मास्क वापरल्याने कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यास विशेषतः मदत होत नाही. एखाद्या व्यक्तीला केवळ संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्यास मास्क घालण्याची आवश्यकता आहे.
 
दावा क्र 2. व्हायरस हवेत स्थिरावत नाही परंतु पृष्ठभागावर राहतो, म्हणून हा हवेद्वारे प्रसारित होत नाही. 
 
उत्तर-  WHO च्या निष्कर्षानुसार, कोरोनाव्हायरसचा विषाणू संक्रमित व्यक्ती खोकते किंवा श्वासोच्छ्वास घेते तेव्हा हवेद्वारे ते दुस-या व्यक्तीपर्यंत पोहचू शकतात. 
 
 दावा क्र- 3- कोरोनाव्हायरस जेव्हा ते एखाद्या धातूच्या पृष्ठभागावर पडतात तेव्हा ते 12 तास जगतात, म्हणून साबणाने आणि पाण्याने चांगले हात धुवून स्वच्छ करणे.
उत्तर-  तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसा हात धुणे आणि आणि सॅनिटायझर वापरणे ही कोरोनाव्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची खबरदारी आहे. कोरोनाव्हायरस 12 तासांपेक्षा जास्त काळ एखाद्या पृष्ठभागावर जगू शकत नाही.
 
दावा क्र- 4 जर विषाणू 26-27 डिग्री सेल्सिअस तपमानावर आला तर तो ठार होईल, कारण तो उष्ण प्रदेशात राहत नाही.  तसेच गरम पाणी पिणे आणि सूर्यप्रकाश घेणे हे महत्त्वाचे आहे. 
उत्तर- कोरोनाव्हायरस उष्ण तापमानात टिकू शकत नाही यात तथ्य नाही. अनेक उष्णकटिबंधीय देशांत हा व्हायरस आढळून आलेला आहे. 
 
दावा क्र- 5 आणि मीठाच्या पाण्याने गुळण्या (गार्गल) केल्याने टॉन्सिलचे जंतू नष्ट होतात आणि त्यांना फुफ्फुसात प्रवेश होण्यापासून प्रतिबंधित करते. आईस्क्रीमपासून दूर रहाणे आणि थंड पदार्थ खाणे टाळणे महत्वाचे आहे.
उत्तर- याबाबत अजून निष्कर्ष आढळून आलेला नाही. आईस्क्रीम किंवा थंड पदार्थ खाल्ल्याने हा व्हायरसची लागण होते याबाबत कोणतेही निष्कर्ष नाहीत. 
 
आम्ही यूनिसेफच्या वेबसाईटवर देखील व्हायरल मॅसेजबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण तिथे देखील हे दावे आढळून आले नाहीत.याशिवाय कोरोना व्हायरससंदर्भात काय काळजी घ्यावी याबद्दल यूनसेफचे एक ट्विट देखील आढळले. यात काय खबरदारी घ्यावी याची माहिती देण्यात आली आहे.
 
 
यावरुन हेच स्पष्ट होते की, सोशल मीडियामध्ये कोरोनाव्हायरसच्या संदर्भात खोटा मॅसेज व्हायरल झाला आहे. 
 
Source
 
Google Search 
 
Result- False 
 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular