Claim– कोरोनाग्रस्तांवर 24 तास उपचार करणा-या इंदोर येथील महिला डाॅक्टर वंदना तिवारी आपल्या तीन वर्षाच्या बाळाला सोडून गेल्या.कोरोनाने त्यांचा जीव घेतला.

सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म शेअरचॅटवर एक पोस्ट व्हायरल होत असून यात म्हटले आहे की, इंदोर येथील डाॅक्टर वंदना तिवारी या 24 तास कोरोनाग्रस्तांची सेवा करत होत्या. तीन वर्षांच्या लहान बाळाला सोडून त्या गेल्या. कोरोनानेच त्यांचा जीव घेतला.
Verification–
आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली, गूगलमध्ये काही किवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला या संदर्भात
फेसबुकवर अनेक पोस्ट आढळून आल्या. यात हाॅस्पिटलमध्ये बेडवर उपचार सुरु असलेल्या महिलेचा फोटो शेअर केला असून यात म्हटले आहे की, हा
फोटो डाॅ. वंदना तिवारी यांचा असून त्या मागील आठवड्यात उत्तर प्रदेशात कोरोनाग्रस्तांचा उपचार करण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी जिहादी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केल्या यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांचा 9 एप्रिल रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
एकाच नावाच्या महिला डाॅक्टरच्या नावाने वेगवेगळे दावे व्हायरल झाल्याने संभ्रम निर्माण झाला. या महिला डाॅक्टरचा मृत्यू नेमका कोरोनामुळे की माॅब लिंचिंगमुळे झाला याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. याशोधा दरम्यान आम्हाला
द लोकनीती या हिंदी वेबसाईटवर या संदर्भात बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, शिवपुरी मेडिकल काॅलेजमध्ये फार्मासिस्ट पदावर कार्यरत वंदना तिवारी यांचा ब्रेन हॅमरेज मुळे मृत्यू झाला. त्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसमुळे सतत काम करत होत्या. त्यांच्या पती ने हाॅस्पिटल प्रशासन आणि सरकारच्या निष्काळजीपणामुळे आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
शोधा दरम्यान आम्हाला उत्तर प्रदेश पोलिसांचे ट्विट आढळून आले ज्यात म्हटले आहे की उत्तर प्रदेशात अशी घटना घडलेली नाही हे प्रकरण मध्य प्रदेशातील आहे.
या शिवाय वंदना तिवारी यांच्या पोस्ट मार्टम रिपोर्ट देखील माध्यमांत आढळून आला. यात देखील त्यांचा ब्रेन हॅमरेज ने मृत्यू झाल्याची माहिती आहे.
शिवाय त्यांचे पती लोकेंद्र शर्मा यांनी माध्यमांना सांगितले की वंदना सतत ड्यूटी करावी लागत असल्याने आपल्या तीन वर्षाच्या मुलीला घरी ठेवून मेडिकल काॅलजमध्येच राहत होत्या.
यावरुन हेच स्पष्ट होते की डाॅ. वंदना तिवारी यांचा मृत्यू हा कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे किंवा माॅब लिंचिंगमुळे झाला नसून ब्रेन हॅमरेज मुळे झाला आहे. सोशल मीडियात त्यांचा हाॅस्पिटलमधील फोटो भ्रामक दाव्याने व्हायरल केला जात आहे.
Source
Sharechat
Facebook
Twitter
Google Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)