Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeCoronavirusचीनमध्ये पोलिस COVID-19 च्या संशयित रुग्णांची धरपकड करत आहेत का?

चीनमध्ये पोलिस COVID-19 च्या संशयित रुग्णांची धरपकड करत आहेत का?

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim- 
कोरोना हा आपल्याला गम्मत वाटते ना? बघा चिन मध्ये त्याची दहशत
यातील शेवट हा हृदय हेलवणारा आहे.
दाव्याचे संक्षिप्त विवरण-
सोशल मीडियामध्ये सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात पोलिस मेट्रो स्टेशनमध्ये लोकांची धरपकड करताना दिसत आहेत. या व्हिडिओबद्दल दावा करण्यात येत आहे की, हा व्हिडिओ चीनमधील असून पोलिस COVID-19 च्या संशियत रुग्णांची अशा प्रकारे धरपकड करत आहेत.
Verifcation- 
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओसंदर्भात आम्ही पडताळणी सुरु केली. याबाबत काही कीवर्ड्सच्या आधारे शोधला असता फेसबुक वर याच दाव्याच्या अनेक पोस्ट आढळून आल्या.
फेसबुक शिवाय ट्विटरवर देखील याच दाव्याने हा व्हिडिओ शेअर होत आहे.
आम्ही या व्हिडिओतील काही स्क्रीनशाॅट्स काढले आणि यांडेक्स इमेजच्या साहाय्याने याबाबत शोध सुरु केला असता हा व्हिडिओ यूट्यूबवर 31 आॅगस्ट 2019 रोजी अपलोड कऱण्यात आल्याचे आढळून आले. हाॅंगकाॅंगच्या Free Press (HKFP) या न्यूज चॅनलने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. हाॅंगकाॅंगमध्ये दंगली भडकल्यानंतर पोलिसांनी मोंग काॅक आणि प्रिंस एडवर्ड एमटीआर स्टेशनवर धरपकड सुरु केली होती. हा व्हिडिओ कोरोना व्हायरस पसरण्याच्या तीन ते चार महीने आधीचा आहे.
याशिवाय साउथ चायना पोस्टच्या यूट्यूब चॅनलवर देखील हा व्हिडिओ संप्टेबर 2019 रोजी अपलोड करण्यात आला होता.
यावरुन हेच स्पष्ट होते की हा व्हिडिओ चीनमधील COVID-19 च्या संशयित रुग्णांना पकडतानाचा नसून काही महिन्यापूर्वी हाॅंगकाॅंगमध्ये सुरु झालेल्या आंदोलने व दंगली दरम्यान पोलिसांनी धरपकड मोहीम राबविली होती त्यावेळचा आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.
Source
Facebook
Google Search
Twitter Advanced Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular