Tuesday, June 25, 2024
Tuesday, June 25, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: कोविड हा आजारच नाही, कोरोनाबद्दल मेसेज करणे गुन्हा, एटीएम लूट...

Weekly Wrap: कोविड हा आजारच नाही, कोरोनाबद्दल मेसेज करणे गुन्हा, एटीएम लूट रोखायची तर उलटा पिन मारा तसेच या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्ट चेक

मागील आठवड्यात सुरुवातीलाच टाटा कंपनी प्रत्येक भारतीयाला २९९९ रुपये देणार आहे असा एक दावा व्हायरल झाला. एक फोटो शेयर करून तो माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आईसोबतचा फोटो असल्याचा दावा करण्यात आला. कोविड हा आजारच नाही असा दावा खुद्द डॉक्टरांनी केला आहे किंवा कोरोना संदर्भात काहीही माहिती शेयर केल्यास तो गुन्हा ठरतो असे दावे व्हायरल झाले. लूट होत असल्यास एटीएम चा पिन उलटा घातल्यास लगेच पोलिसांना कळेल असा एक दावा पुन्हा एकदा व्हायरल करण्यात आला होता. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.

टाटा देशवासियांना देणार प्रत्येकी २९९९?

टाटा देशवासियांना देणार प्रत्येकी २९९९?

एक बनावट लिंक देऊन यावरून टाटा कंपनी सर्व देशवासियांना प्रत्येकी २९९९ रुपये देणार आहे, असा दावा करण्यात आला होता. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.

तो फोटो वाजपेयींचा नव्हे

तो फोटो वाजपेयींचा नव्हे

माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी आपल्या आईच्या कवेत बसले आहेत, असे सांगून एक फोटो व्हायरल करण्यात आला. आमच्या तपासात हा फोटो वाजपेयींच्या बालपणीचा नसल्याचे उघड झाले.

कोविड-१९ हा आजार नाही का?

कोविड-१९ हा आजार नाही का?

जगभरातल्या डॉक्टरांनी कोविड १९ हा आजारच नसल्याचे मान्य केले आहे, असे सांगून एक दावा मोठ्याप्रमाणात पसरविण्यात येत होता. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करण्यासाठी केला असल्याचे स्पष्ट झाले.

कोविड-संबंधित कोणतीही माहिती शेयर करणे दंडनीय आहे?

कोविड-संबंधित कोणतीही माहिती शेयर करणे दंडनीय आहे?

कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोविड संदर्भातील माहिती शेयर करणे हा दंडनीय अपराध असल्याचा एक मेसेज व्हायरल झाला होता. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.

एटीएम पिन बद्दल हे खरे आहे?

एटीएम पिन बद्दल हे खरे आहे?

जर आपल्याला कोणी लुटत असल्यास आपण एटीएम पिन चा क्रमांक उलटा घालावा. तात्काळ पोलिसांना सूचना जाईल आणि ते दाखल होतील. असा दावा करण्यात आला होता. आमच्या तपासात या दाव्याला काहीच आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular