After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Claim–
कोरोनाचा सामना करण्यासाठी जगात सर्वात जास्त रक्कम रतन टाटांनी यांनी दान केली आहे.
टिकटाॅक या सोशल मीडिया अॅप वर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात कोरोनाशी लढा देण्यासाठी दान देणा-या जगभरातील पाच प्रमुख दात्यांची नावे सांगितली आहेत तसेच कुणी किती रक्कम दिली याची माहिती दिली आहे. यात विजय शेखर शर्मा हे पाचव्या क्रमांकावर असून त्यांनी 505 कोटींची मदत , मुकेश अंबानी ( चौथे) 510, बिल गेट्स( तिसरे) 825 कोटी, तर दुस-या क्रमांकावर विप्रो से अजीम प्रेमजी 1125 कोटी तर पहिल्या क्रमांकावर रतन टाटा हे असून त्यांनी 1500 कोटींची मदत केल्याची माहिती देण्यात आली आहे.
Verification–
आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली असता आम्ही पहिल्यांदा पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्या बाबतीत केलेल्या दाव्याचा शोध घेतला असता
नवभारत टाईम्समध्ये याबद्दलची बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की पेटीएम कंपनीने 500 कोटींची मदत करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे तर संस्थापक विजय शेखर शर्मा हे वैयक्तिक पाच कोटींची मदत करणार आहेत.
मुकेश अंबानी यांच्याबाबतचा दावा देखील खरा असल्याचे आढळून आले. यानंतर आम्ही बिल गेट्स यांनी दिलेल्या दानाबद्दल माहिती घेतली असता
दैनिक भास्कर मध्ये बातमी आढळून आली यात म्हटले आहे की गेट्स यांनी 750 कोटींची मदत करण्याचे ठरविले आहे.
यानंतर आम्ही विप्रो च अजीम प्रेमजी यांनी किती रक्कम दान केली आहे याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली असता आम्हाला
आज तक ची बातमी आढळून आली यात म्हटले आहे की, विप्रो कंपनी थेट पीएम केअर फंडात रक्कम जमा न कोरनाशी लढण्यासाठी विप्रो ग्रुप 1125 कोटी स्वत:खर्च करणार आहे.
यानंतर आम्ही रतन टाटा यांनी नेमकी किती मदत केली आहे याचा शोध घेतला असता आम्हाला
हिंदी मनी कंट्रोल या वेबसाईटवर बातमी आढळून आली यात म्हटले आहे की रतन टाटा यांनी 1500 कोटींची मदत करण्याची घोषणा केली आहे. मात्र यात कुठेही टाटा यानी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जगात सर्वात जास्त रक्कम दान केल्याचे म्हटलेले नाही.
आम्ही काही इंग्रजी किवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला मात्र रतन टाटा यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत रतन टाटा यांनी जगात सर्वात जास्त रक्कम दान केल्याची माहिती आढळून आली नाही. मात्र ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी 7500 कोटींची मदत दिली असल्याची बातमी
नवभारत टाईम्स मध्ये आढळून आली. याबाबत त्याने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. या रकमेचा उपयोग कोरोना व्हायरचा प्रसार थांबवण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणासाठी व आरोग्यासाठी खर्च करणार असल्याचे त्याने म्हटले आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की टिकटाॅक व्हिडिओमध्ये करण्यात आलेले बहुतांश दावे हे भ्रामक आहेत. टाटांनी भारतात सर्वात जास्त रक्कम मदत म्हणून दिली आहे मात्र जगभरात याहून जास्त रक्कम मदत देणारे दाते असल्याचे हे पडताळणीत समोर आले आहे. त्यामुळे व्हिडिओत केलेला दावा हा भ्रामक आहे.
Source
Tiktok
Google Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.