Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
पुणे रेल्वे स्टेशनवर प्लॅटफार्म तिकिट 50 रुपये करण्यात आल्याच्या पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. दावा करण्यात येत आहे की. पुणे रेल्वे स्टेशनचे खाजगीकरण केल्याने आता प्लॅटफार्म तिकिटासाठी 50 रुपये मोजावे लागत आहेत. पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, काॅंग्रेसच्या काळात प्लॅटफाॅर्म तिकिट दर 3 रुपये होता, आता भाजपाच्या काळात 50 रुपये झाला आहे.
Fact Check / Verification
पुणे रेल्वे स्टेशनचे खाजगीकरण खरंच केले आहे काय आणि प्लॅटफाॅर्म तिकिट दर 50 रुपये करण्यात आला आहे का याची पडताळणी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. या शोधा दरम्यान आम्हाला काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे देखील ट्विट आढळून आले.
या विषयी आम्ही अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. नवीन प्लॅटफाॅर्म तिकिटावर IRSDC असे लिहिले आढळून आले. याचा नक्की अर्थ काय याचा शोध घेतला असता आम्हाला हा इंडियन रेल्वेचाच एक विभाग असल्याचे आढळून आले.
याशिवाय आम्हाला एबीपी माझाची बातमी आढळून आली. रेल्वे प्रशासनाकडून प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर अचानक वाढवण्यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, गर्दी कमी करण्यासाठी आणि अनावश्यक कामासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी करणाऱ्यांना रोखण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
याशिवाय आम्हाला punekarnews.in या न्यूज वेबसाईटवर देखील बातमी आढळून आली. ज्यात रेल्वे प्रशासनाने कोरोना संकटाचे कारण दिल्याचे म्हटले आहे. तसेच Indian Express ची पण बातमी आढळून आली. यात देखील रेल्वे प्रशासनाने ही दरवाढ तात्पुरती असून प्लॅटफाॅर्मवर गर्दी टाळण्यासाठी तिकिटदरवाढ केल्याचे स्पष्टिकरण दिले असल्याचे म्हटले आहे. याशिवाय रेल्वे प्रवक्त्यांचे ट्विट देखील शेअर केले आहे.
Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की, पुणे रेल्वे स्टेशनवर कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकिटदर पाच पट वाढविण्यात आला आहे. सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.
Result- Misleading/ partly False
Sources
इंडियन एक्सप्रेस- https://indianexpress.com/article/cities/pune/pune-platform-ticket-cost-increased-goes-viral-6560231/
पुणेकर न्यूज- https://www.punekarnews.in/pune-railway-platform-ticket-priced-at-rs-50-railways-say-its-temporary/
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.