Sunday, June 23, 2024
Sunday, June 23, 2024

HomeFact CheckViralचुकीच्या दाव्याने व्हायरल होतोय महेश भट्ट यांचा व्हिडिओ, हे आहे सत्य

चुकीच्या दाव्याने व्हायरल होतोय महेश भट्ट यांचा व्हिडिओ, हे आहे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

बाॅलीवुडमधील प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक महेश भट यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात महेश भट रागाने भडकलेले दिसत आहेत दावा करण्यात येत आहे की सड़क 2 या त्यांच्या चित्रपटाच्या व्हिडिओला एक कोटी डिसलाईक मिळाल्याने ते भडकले आहेत. पोस्टमध्ये म्हटले आहे की विचार करा यांनी सुशांतच्या जवळच्या लोकांना किती त्रास दिला. आता आपल्यावर वेळ आली तर यांचे संतलुन बिघडले.

संग्रहित

Fact Check / Verification

व्हिडिओमध्ये महेश भट रागाने म्हणत आहे की या प्रश्नाचे कोणतेच उत्तर नाही जे लोक म्हणतात की त्यांच्याजवळ उत्तर आहे ते नाटक करत आहेत. महेश भट्ट यांच्याजवळ बसलेली त्यांची पत्नी सोनी राजदानच्या चेह-यावर वेगळ्या भावना दिसून येतात तर त्यांची मुलगी आलिया भट त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसते.

महेश भट यांचा व्हिडिओ फेसबुकवर देखील व्हायरल झाला आहे.

https://www.facebook.com/watch/?v=1000125687112791&extid=t6bgytYmK8kcMuOG

आम्ही काही किवर्डच्या आधारे हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. असता आम्हाला इंटरटेन्मेंट टाईम्स या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ आढळून आला. या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये शाहीन भट हिच्या पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमाचा असल्याचे म्हटले आहे.हा व्हिडिओ 2019 मध्ये अपलोड करण्यात आलेला आहे.

याशिवाय हिंदुस्तान टाईम्सची बातमी देखील आढळून आली ज्यात म्हटले आहे कि, आपल्या मुलीच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच महेश भट एका प्रश्नावर भडकले आणि त्यांना त्यांची मुलगी आलिया भट हिने शांत करण्याचा प्रयत्न केला.

बाॅलिवुडचे प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानी यांनी देखील आपल्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर केला होता.

https://www.instagram.com/p/B5xE_HsnkUK/

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, महेश भट यांचा 2019 मधील व्हिडिओ आत्ताचा म्हणून चुकीच्या दाव्याने शेअर होत आहे.

Result- Misleading

Sources

Hindustan Times- https://www.hindustantimes.com/bollywood/alia-bhatt-tries-to-calm-down-dad-mahesh-as-he-loses-cool-at-daughter-s-book-launch-watch-video/story-Nk6MEpkNB9uMKEsB1kVEfP.html

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular