Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
मास्कवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याचा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हायरल पोस्टमध्ये “जे मास्क आणि सॅनिटायझरवर 18 टक्के लावतात ते लस फुकट देतील का?” असा सवाल देखील करण्यात येत आहे.
Fact Check/Verification
मास्क आणि सॅनिटायझरवर खरंच 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला 15 जुलै रोजी प्रसिद्ध झालेली इकाॅनाॅमिक्स टाईम्सची बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, सॅनिटायझरवर 18 टक्के जीएसटी लागणार आहे.
मात्र मास्कवर किती जीएसटी लागणार याची माहिती यात दिलेली नाही त्यामुळे आम्ही अधिक शोध घेतला असता cleartax या वेबसाईटवर 30 जुलै 2020 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली माहिती यानुसार कापसापासून बनवलेल्या फेस मास्कवर 5 टक्के तर याव्यतिरिक्त असणाऱ्या मास्कवर 12 टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. सॅनिटायझर आणि हँडवॉश यासारख्या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी आकारला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
याशिवाय दैनिक प्रभात ने एप्रिल 2020 मध्ये याबाबत वृत्त दिले होते. यात म्हटले होते की वैद्यकीय उपकरणांच्या किमती कमी होणार नाहीत यात मास्कवर 5 टक्के जीएसटी लावण्यात आल्याचे म्हटले आहे.
Conclusion
यावरुन हेच सिद्ध होते की, मास्कवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत नाही. सोशल मीडियात चुकीची माहिती शेअर केली जात आहे.
Result: Misleading
Our Source
cleartax- https://cleartax.in/s/mask-hand-wash-sanitizer-ppe-kit-ventilator-gst-rate-hsn-code
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.