Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात रात्रीच्या वेळी हजारो शेतकरी रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेले दिसत आहे. दावा करण्यात येत आहे की, पंजाब हरियाणामधून आलेल्या शेतक-यांनी दिल्लीजवळ असा ठिय्या दिला आहे. केंद्र सरकारने मांडलेल्या कृषी विधेयकांना पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलनाद्वारे विरोध करत आहेत. अशातच हा फोटो व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियामध्ये हा फोटो दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा असल्याचा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
Fact Check/Verification
व्हायरल फोटो नेमका कुठला आहे याचा तपास सुुरु केला. सध्या दिल्लजवळ सुरु असलेल्या शेतकरी आंदोलानाचा हा फोटो असल्याची बातमी आम्हाला मुख्य प्रवाहातील माध्यमांत आढळून आली नाही. यानंतर आम्ही व्हायरल फोटोचा गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध सुरु केला. या शोध दरम्यान आम्हाला Mumbai Live या ट्विटर अकाउंटवर दोन वर्षांपूर्वीचे ट्विट आढळून आले. ज्यात हा व्हायरल फोटो शेअर करण्यात आला आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी सुमारे 25000 शेतकरी मुंबईकडे निघालेल्या मोर्चात सामिल झाले आहेत. सगळे शेतकरी ठाण्यातील विव्हियाना माॅलसमोर ईस्टर्न एक्सप्रेस वे वर जमले आहे.
आम्ही अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता एबीपी माझाची 11 मार्च 2018 रोजीची बातमी आढळून आली. यात किसान सभेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आहे. यात गावागावातील लोक जोडले गेल्याची माहिती सभेचे अजित नवले यांनी दिली आहे.
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीन काढण्यात आलेला मोर्चा 12 मार्च 2018 रोजी आझाद मैदानात पोहचला होता. त्यावेळी एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट करुन ही माहिती दिली होती.
Conclusion
यावरुन स्पष्ट होते की, व्हारल फोटो दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा नसून दोन वर्षापूर्वी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने नाशिक ते मुंबईपर्यंत काढलेल्या मोर्चाचा ठाणे येथील आहे. हाच फोटो आता सोशल मीडियात चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.
Our Sources
मुंबई लाईव्ह- https://twitter.com/MumbaiLiveNews/status/972515680414289920
एबीपी माझा- https://www.youtube.com/watch?v=hpNCS31WaLw
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.