Wednesday, September 27, 2023
Wednesday, September 27, 2023

घरFact CheckViralशिवलिंगावर पाय ठेवणाऱ्या युवकाचा फोटो आताचा आहे? चुकीचा दावा व्हायरल

शिवलिंगावर पाय ठेवणाऱ्या युवकाचा फोटो आताचा आहे? चुकीचा दावा व्हायरल

याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर हिंदीने केले असून हा लेख अर्जुन देवडिया याने लिहिला आहे.

Claim

सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात एक युवक शिवलिंगावर पाय ठेवतांना दिसत आहे. फोटो व्हायरल होण्यासाठी पोस्टमध्ये म्हटलंय की, त्यामुळे व्यक्ती पकडला जाईल. काही लोक याला धार्मिकतेचा रंग देत आहे. 

फोटो साभार : Twitter@HinduArmy0

Fact Check

या फोटो पडताळणी करण्यासाठी आम्ही हा फोटो गुगल रिव्हर्स करून शोधला. तेव्ह आम्हांला समजले की, हा फोटो ऑगस्ट २०१९ मध्ये व्हायरल झाला होता. त्यावेळी युपीच्या आझमगड पोलिसांनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिली होती. त्याचे म्हणणे होते की, भगवान शिव यांच्या मूर्तीवर पाय ठेवून फोटो काढून व्हायरल करणारे दोन युवक होते. त्यांचे नाव ऋषि कुमार आणि नीरज कुमार आहे. दोघेही आंबेडकरनगरच्या एका हरिजन वस्तीत राहणारे आहे. त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. 

या संदर्भात आंबेडकरनगर पोलिसांनी देखील ट्विट करून लिहिले होते की, तरुणांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत आहे. व्हायरल फोटो व्यतिरिक्त त्यावेळी अजून एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात अजून दोन युवकांनी देखील शिवलिंगावर पाय ठेवला होता.

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, व्हायरल फोटो आताचा नसून तीन वर्षांपूर्वीचा आहे. शिवलिंगावर पाय ठेवणाऱ्या युवकावर पोलिसांनी त्यावेळी कारवाई देखील केली आहे. 

Result : Missing Context

जर तुम्हांला माझी तथ्य पडताळणी आवडत असेल तर असेच विविध लेख या दुव्यावर टिचकी मारून तुम्ही वाचू शकता.


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular