Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact CheckWeekly Wrap : शिक्षण मंडळाच्या अर्जातून ‘हिंदू’ शब्द हटविल्याचा दावा ते युपीआय...

Weekly Wrap : शिक्षण मंडळाच्या अर्जातून ‘हिंदू’ शब्द हटविल्याचा दावा ते युपीआय व्यवहारांवर शुल्क

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. ठाकरे सरकारने शिक्षण मंडळाच्या अर्जातून हिंदू शब्द हटविल्याचा दावा तसेच दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचे काही फोटो व्हायरल झाले. याशिवाय इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप-5 फेक न्यूज वाचू शकता.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अर्जातून ‘हिंदू’ शब्द हटविल्याचा दावा

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अर्जातून ‘हिंदू’ शब्द हटविल्याचा दावा व्हायरल झाला आहे. तसेच ठाकरे सरकारने शिक्षण मंडळाच्या फाॅर्ममधून हिंदू शब्द हटविल्याच्या काही बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. पडताळणीत अर्जातील बदल हा आताच्या सरकारच्या काळातील नसून 2014 साली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं युतीचं सरकार होते त्यावेळचा असल्याचे समोर आले. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात रितिक रोशन सहभागी झाल्याचा दावा व्हायरल

विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कृषीमंत्री नरेंद्र तोमर व इतर नेत्यांशी वारंवार बैठक घेतली. मात्र चर्चा निष्फळ झाल्याने देशव्यापी संप करण्यात आला आहे. अशातच दिल्लीतीच्या सीमेवर सुरु असलेल्या या आंदोलनात बाॅलीवुड अभिनेता रितिक रोशन सहभागी झाल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. पणे हे सत्य नाही, रितिक रोशनचा तीन वर्षापूर्वीचा फोटो आता व्हायरल झाला आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा

केईएम हॉस्पिटलमध्ये काही तासात पक्षघात बरा करणारी मशीन उपलब्ध झाल्याचा दावा व्हायरल

व्हाट्सअॅपवर आलेल्या मॅसेजमध्ये म्हटले आहे की, “के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षघात (प्यारालेसीस /लकवा )या आजारावर अँटोमॅटिक या मशीन द्वारे काही तासातच रुग्ण पूर्ववत बरा होतो, मेंदूच्या गाठी या मशीनच्या सहाय्याने एन्जोप्लाष्टी प्रमाणे काढुन टाकल्या जातात, तसेच भारतात प्रथम याच हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे. पण हे सत्य नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

हजारो शेतकरी जमल्याचा फोटो दिल्लीतील आंदोलनादरम्यानचा असल्याचा दावा

हजारो शेतकरी जमल्याचा फोटो दिल्ली आंदोलनादरम्यानचा असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या फोटोत हजारो लोक रात्रीच्या अंधारात एकत्र जमल्याचे दिसत आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, कडाक्याच्या थंडीत जगाचा पोशिंदा दिल्लीत ठाण मांडुन बसला आहे, सरकारचा जाहीर निषेध. पण हे सत्य नाही.याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

गुगल पे, फोन पे सारख्या UPI व्यवहारांवर 1 जानेवारीपासून शुल्क आकारले जाणार

आजपर्यंत मोफत असलेले युपीआय ट्रान्झेक्शनसाठी आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. कारण UPI पेमेंटवर 1 जानेवारीपासून शुल्क आकारले जाणार आहे. जर कोणी थर्ड पार्टी अॅपद्वारे युपीआय ट्रान्झेक्शन करणार असेल तर त्यासाठी शुल्क मोजावे लागणार आहे.  पण हे सत्य नाही. प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत, नवीन वर्षापासून युपीआय व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular