Sunday, April 28, 2024
Sunday, April 28, 2024

HomeFact Checkअभिनेता टिकू तलसानियाने इस्लाम स्वीकारला? व्हायरल दाव्याचे हे आहे सत्य 

अभिनेता टिकू तलसानियाने इस्लाम स्वीकारला? व्हायरल दाव्याचे हे आहे सत्य 

Authors

चित्रपट अभिनेता टिकू तलसानियाने इस्लाम धर्म स्वीकारल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. व्हायरल फोटोमध्ये टिकू तलसानिया वाढलेल्या दाढीमध्ये दिसत आहे.

व्हायरल फोटो शेअर करताना, एका फेसबुक वापरकर्त्याने म्हटले आहे की, “भारतातील प्रसिद्ध कॉमेडियन टिकू तलसानिया डायरा #इस्लाम धर्मात सामील झाला आहे.”

टिकू तलसानिया
Screenshot of Facebook Post/Mohammed Saad Saifi

त्याच वेळी, दुसर्‍या वापरकर्त्याने व्हायरल फोटो शेअर केला आणि लिहिले की, “भारतातील प्रसिद्ध कॉमेडियन टिकू तलसानिया डायरा #इस्लाम धर्मात सामील झाला आहे.”

Screenshot of Facebook Post/Md Jawed Haider Ali

Fact Check/Verification

चित्रपट अभिनेता टिकू तलसानिया याने इस्लाम धर्म स्वीकारल्याच्या दाव्यासह सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही काही कीवर्डच्या मदतीने Google वर शोध सुरू केला. दरम्यान, आम्हाला 6 फेब्रुवारी 2022 रोजी Khush Rangच्या YouTube चॅनेलद्वारे अपलोड केलेला व्हिडिओ प्राप्त झाला. व्हिडिओनुसार, “टिकू तलसानियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने इस्लाम स्वीकारल्याचा दावा केला आहे. पण हे खरे नाही, हा एक ड्रामा व्हिडिओ आहे, ज्याच्या शूटिंगदरम्यान हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता.

तपासादरम्यान आम्हाला टिकू तलसानियाची मुलाखत आढळली, जी 19 जानेवारी 2022 रोजी शेमारूच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे शेअर केली गेली होती. या मुलाखतीत तलसानिया दाढीशिवाय दिसत आहेत.

यासंदर्भात आम्ही टिकू तलसानिया यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले, “व्हायरल फोटोत मी परिधान केलेला पोशाख फक्त नाटकातील पात्र आहे. मी इस्लाम धर्म स्वीकारलेला नाही. बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्या तरी त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत.

Conclusion

चित्रपट अभिनेता टिकू तलसानियाने इस्लाम धर्म स्वीकारला नसल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे. दिशाभूल करणारा दावा व्हायरल झाला आहे.

Result: False Context/Missing Context

Sources

Direct Contact Tiku Talsania

Youtube Video

Shimaro

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular