Saturday, December 21, 2024
Saturday, December 21, 2024

HomeFact CheckViralबेंगलुरुत शेतक-यांनी स्वत:चे सुपर मार्केट सुरु केलेले नाही, हे आहे सत्य

बेंगलुरुत शेतक-यांनी स्वत:चे सुपर मार्केट सुरु केलेले नाही, हे आहे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

बेंगलुरुत शेतक-यांनी स्वत:चे सुपर मार्केट सुरु केले असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात म्हटले आहे की, बेंगलुरू कर्नाटकात शेतकऱ्यांनी सुरू केले स्वतःचे फळ, भाजींचे स्वतःचे सुपर मार्केट शेतातील माल डायरेक्ट ग्राहका कडे. आता असेच केले पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच पुढे आले पाहिजे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान हा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

फेसबुक/ संग्रहित

https://www.facebook.com/NanditaPharma/posts/1492126557644545

Fact Checking/Verification

व्हायरल होत असलेल्या पोस्टमधील काही फोटोंचा गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला 2 डिसेंबर रोजी प्रकाशित झालेल्या एका इंग्रजी लेखात यातील एक फोटो आढळून आला. यात म्हटले आहे की, हा फोटो बंगळुरुमधील अ‍ॅग्रो बेस्ड स्टार्टअप HUMUS चा आहे. अधिक माहिती मिळवण्याकरिता आम्ही कंपनीच्या वेबसाईटला भेट दिली असता ह्या स्टार्टअपची सुरुवात 2019 ला झाली असल्याची माहिती मिळाली शिवाय व्हायरल होत असलेल्या फोटोपैकी काही फोटो देखील वेबसाईटवर दिसून आले. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दलालांची साखळी कमी करुन हा गुंता सोडविण्याचा उपक्रम HUMUS सुरु केला असून याचाच एक भाग म्हणून बंगलुरुत सुपरमार्केट सुरु करण्यात आले आहे. कंपनी थेट शेतकऱ्यांकडून फळे आणि भाजीपाला विकत घेते आणि तो रास्त भावात ग्राहकांना पुरवते. शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी काम करत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

याशिवाय ह्या स्टार्टअप संदर्भातले नोव्हेंबर महिन्यातील ट्विट देखील आढळून आले.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल पोस्टमधील फोटो बंगलुरुमधील सुपरमार्केटचा आहे, मात्र हे मार्केट एका खाजगी कंपनीने सुरु केलेले आहे, शेतक-यांनी नाही.

Result: Misleading

Our Sources

Indianweb2.com- https://www.indianweb2.com/2020/12/venture-catalysts-9unicorns-we-founders.html

Twitter-https://twitter.com/NeerajEmotion/status/1329629129872875521

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular