Tuesday, September 17, 2024
Tuesday, September 17, 2024

HomeFact Checkदोन वर्षांपूर्वीचा युपीतला व्हिडिओ खरगोन हिंसेचा म्हणून शेअर केला जातोय

दोन वर्षांपूर्वीचा युपीतला व्हिडिओ खरगोन हिंसेचा म्हणून शेअर केला जातोय

Claim

सोशल मीडियावर मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये घडलेल्या धार्मिक हिंसेचा म्हणून शेअर होणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओत एक पोलीस अधिकारी काही महिलांना एका गाडीत बसवताना दिसत आहे.

त्या व्हिडिओत असा दावा केलाय की, हा व्हिडिओ खरगोनमधील आहे. पोलिसांनी हिंदू लोकांवर दगडे आणि पेट्रोलचे बॉम्ब फेकणाऱ्या मुस्लिम महिलांना कारागृहात पाठवले. 

Fact

दोन वर्षांपूर्वीचा युपीतला व्हिडिओ खरगोन हिंसेचा दावा केल्या जाणाऱ्या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी आम्ही इन-वीड टूलची मदत घेतली. तेव्हा आम्हांला हा व्हिडिओ एका फेसबुक पानावर आढळला. 

हा व्हिडिओ तिथे १५ एप्रिल २०२० रोजी अपलोड केला होता. त्यात तो व्हिडिओ उत्तर प्रदेशातील मुरदाबादमधील सांगितला जात आहे. काही कीवर्ड टाकून आम्ही हा व्हिडिओ युट्यूबवर शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हांला इंडिया ब्लूमस न्यूज सर्व्हिस नावाच्या एका युट्यूब वाहिनीवर हा व्हिडिओ मिळाला. 

तिथेही हा व्हिडिओ १५ एप्रिल २०२० रोजी अपलोड केला असून तो मुरदाबादमधील आहे, असं सांगितले आहे. 

त्या व्हिडिओसोबत लिहिले होते की, मुरदाबादमधील डॉक्टर आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या एका टीमवर हल्ला झाला. ज्यावेळी कोरोनाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तेव्हा त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला क्वारंटाईन सेंटरमध्ये घेऊन जात होते.

या घटनेसंबंधित त्यावेळी एनडीटीव्हीने एक बातमी प्रकाशित केली होती. त्या बातमीत व्हायरल व्हिडिओ दिसत आहे. ही घटना मुरदाबादमधील नवाबपुरा कॉलनीतील आहे. त्या बातमीनुसार, जेव्हा आरोग्य अधिकाऱ्यांची टीम कोरोनाच्या रुग्णांना घ्यायला आले. तेव्हा काही लोकांनी त्यांच्यावर दगडे आणि वीट फेकण्यास सुरवात केली.

या घटनेत पोलिसांवर देखील हल्ला झाला होता. त्यानंतर पोलिसांनी ७ महिला आणि १० पुरुषांना अटक केली. हा व्हिडिओ त्याच घटनेचा आहे.

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, युपीतील दोन वर्षांपूर्वीचा जुना व्हिडिओ आता खरगोनमध्ये झालेल्या हिंसेच्या घटनेचा समजून शेअर होत आहे. हा दावा भ्रामक म्हणून शेअर केला जात आहे. 

इथे वाचू शकता : मुंबईतील तीन वर्षांपूर्वीच्या गणपती विसर्जनाचा व्हिडिओ रामनवमीचा सांगितला जातोय 

Result : False Context/False

जर तुम्हाला आमचे फॅक्ट चेक आवडत असतील तर अन्य फॅक्ट चेक वाचण्यासाठी तुम्ही इथे वाचू शकता.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular