Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact Checkमहेंद्रसिंग धोनीने शेतक-यांच्या दिल्लीतील ट्रॅक्टर परेडला समर्थन दिलेले नाही, चुकीचा दावा व्हायरल

महेंद्रसिंग धोनीने शेतक-यांच्या दिल्लीतील ट्रॅक्टर परेडला समर्थन दिलेले नाही, चुकीचा दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

महेंद्रसिंग धोनीने शेतक-यांच्या दिल्लीतील ट्रॅक्टर परेडला समर्थन दिले असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पोस्टमध्ये धोनीचा ट्रॅक्टरवर उभा राहिल्याचा फोटो शेअर केला असून यात म्हटले आहे की, भारतीय क्रिकेट टीमचे माजी कप्तान महेंद्रसिंग धोनीने दिल्लीत 26 जानेवारीला होणा-या शेतक-यांच्या ट्रॅक्टर परेडचे समर्थन केले आहे. आता भाजपचे अडाणी भक्त धोनीला देखील हिंदूविरोधी घोषित करतील.

ट्विटर/ संग्रहित

https://www.facebook.com/groups/472393423731562/permalink/519667815670789

संग्रहित

Fact Check / Verification

केंद्र सरकारने केलेल्या कृषि कायद्यांविरोधात शेतक-यांनी मागील काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु केले आहे. या कायद्यांचा विरोध म्हणून शेतकरी 26 जानेवारी रोजी दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढणार आहेत. दिल्ली पोलिसांनी या परेडला परवानगी दिली आहे. अशातच महेंद्रसिंग धोनीचा लाल रंगाच्या ट्रॅक्टरवर उभा राहिल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. दावा करण्यात येत आहे की, धोनीने देखील या परेडला समर्थन दिले आहे. आम्ही व्हायरल दाव्याचे नेमके सत्य काय आहे याची पडताळणी सुरु केली.

व्हायरल फोटो रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधला असता महेंद्रसिंग धोनी विषयी जून 2020 मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आढळून आल्या. यात एबीपी माझाची 29 जून 2020 रोजीची बातमी देखील होती. यात म्हटले आहे की, कोरोना व्हायरसमुळे अनेक खेळांच्या आयोजनाला ब्रेक लागला आहेत. क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू आपापल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. महेंद्रसिंह धोनी तर शेती करताना दिसत आहे. नुकताच धोनीचा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज टीमने 2 जून रोजी धोनीचा हाच ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता.

काही दिवसांनी यात ट्रॅक्टने महेंद्रसिंग धोनी शेत नांगरतानाचा व्हिडिओ धोनीच्या आॅफिशियल ट्विटर हॅंडलवर शेअर करण्यात आला होता.

महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सेंद्रिय शेती सुरु केली असल्याची बातमी देखील आम्हाला या दरम्यान आढळून आली.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, अमेरिकेच्या 100 डाॅलरच्या नोटेवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो छापण्यात आलेला नाही. सोशल मीडियात फोटोशाॅप्ड इमेज व्हायरल झाली आहे.

Result – Misleading

Our Sources

एबीपी माझा- https://marathi.abplive.com/sports/cricket/ms-dhonis-organic-farming-at-ranchi-video-goes-viral-on-social-media-784445

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular