Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
‘एका आईने आपल्या बाळाला वाचवण्यासाठी प्राणाचाही त्याग केला’ या कॅप्शनसह सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर होत आहे, ज्यामध्ये नवजात बाळ आपल्या आईला मिठी मारून रडताना दिसत आहे. काही युजर्सनी या व्हिडीओमधून घेतलेल्या फोटोसोबत आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये आई आणि बाळामधील हे संवेदनशील दृश्य पाहून डॉक्टरही भावूक झाल्याचा दावा केला जात आहे.
व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज गुजरात मध्ये एका आईला 12 वर्षांनंतर मुलगा होण्याचे सौभाऊ लाभले, पण खेदाची बाब होती की एकतर मुलगा वाचेल नाहीतर आई जगेल असे डॉक्टरांनी सांगितले त्या आईने डॉक्टरांना सांगितले ह्या मुलाचे आयुष्य आणि आईने अवघ्या 2 मिनिटांमध्ये मुलाचे लाड केले आणि प्राण सोडले. त्यावेळी डॉक्टरांच्या डोळ्यातून अश्रू आले. भावपूर्ण श्रद्धांजली माय… ‘एका आईने आपल्या बाळाला वाचवण्यासाठी प्राणाचाही त्याग केला’
आमच्या अनेक वाचकांनी व्हायरल होत असलेल्या ‘एका आईने आपल्या बाळाला वाचवण्यासाठी प्राणाचाही त्याग केला’ या व्हिडिओ नेमके काय आहे याची पडताळणी करण्याची विनंती आम्हाला केली आहे.
Fact Check / Verification
‘एका आईने आपल्या बाळाला वाचवण्यासाठी प्राणाचाही त्याग केला’ या व्हायरल होत असलेल्या दाव्याचे सत्य काय हे तपासण्यासाठी आम्ही गुगल सर्चचा आधार घेतला. काही किवर्ड्सनी शोध घेतला असता आम्हाला “Merve Tiritoğlu Şengünler Photography” या फेसबुक पेजवर हा फोटो आढळून आला.
Merve Tiritoğlu Şengünler हा एक तुर्की फोटोग्राफर आहे जो अशा प्रकारे मातृत्वाचे फोटो काढतो. डिसेंबर 2015 चा हा फोटो Merve फेसबुक अकाउंटवर शेअर करण्यात आला होतो. “En güzel kavuşma” (सर्वात सुंदर पुनर्मिलन) शीर्षक असलेली व्हायरल आई आणि नवजात बाळाचा फोटो येथे पाहिले जाऊ शकतो.
दरम्यान, दुसरा फोटो देखील व्हायरल झालेल्या दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर करण्यात आला आहे म्हटले आहे की, ‘एका आईने आपल्या बाळाला वाचवण्यासाठी प्राणाचाही त्याग केला’ हे पाहून डॉक्टरही रडू लागले आहेत. यासाठी, गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता आढळून आले की, सप्टेंबर 2017 मध्ये इंस्टाग्राम अकाउंट ozgemetin photography वर असाच एक फोटो पोस्ट केला गेला होता. पोस्टसोबत दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती डॉक्टर नसून एक पिता बनली आहे, ज्याच्या आनंदात तो भावूक झालेला दिसतो. Ozgemetin हा देखील तुर्कीचा फोटोग्राफर आहे जो अशा प्रकारे मातृत्वाचे फोटो काढतो. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर इतर छायाचित्रेही पाहता येतात.
इंस्टाग्राम अकाउंट ozgemetin photography वरील पोस्टचा स्क्रिनशाॅट
Conclusion
आमच्या पडतालणीत स्पष्ट झाले की ‘एका आईने आपल्या बाळाला वाचवण्यासाठी प्राणाचाही त्याग केला’ या दाव्यासह व्हायरल आई व नवजात बालकाचा फोटो गुजरातमधील नाही तसेच आईने बाळासाठी प्राणत्याग केल्याचा व भावूक होऊन डाॅक्टर रडत असल्याचा दावा देखील चुकीचा आहे.
Result :- False
Our Source
Merve Tiritoğlu Şengünler Photography
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.