Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact CheckNewsवृत्तपत्रातील बातमी अग्निपथ योजनेशी संबंधित आहे? याचे सत्य जाणून घ्या

वृत्तपत्रातील बातमी अग्निपथ योजनेशी संबंधित आहे? याचे सत्य जाणून घ्या

(याची तथ्य पडताळणी न्यूजचेकर इंग्रजीने केली असून हा लेख Pankaj Menon यांनी लिहिला आहे)

Claim

नुकतेच सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे तरुणाने आत्महत्या केली.

फोटो साभार : Twitter@JeetFixWriter

(या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता) 

Fact Check / Verification

या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही गुगल लेन्सच्या मदतीने वृत्तपत्रातील बातमीत दिसणाऱ्या मजकुराच्या आधारे कीवर्ड टाकून शोधले. त्यानंतर आम्हांला २९ एप्रिल २०२२ रोजीची ही घटना आहे, असे आढळले. त्या बातम्या तुम्ही इथे, इथे, इथे वाचू शकता. 

बातम्यांमध्ये दिलेले तपशील जुळत असल्याचे आम्हांला आढळले. हरियाणातील भिवानी येथील २३ वर्षीय त्या तरुणाचे नाव पवन आहे. त्याने लहानपणापासून सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहिले होते, त्यासाठी त्याने परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश आले नाही. त्याने लष्करासाठी वयोमर्यादा ओलांडली होती. त्या कारणामुळे त्याने आत्महत्या करून स्वतःला संपवले. ज्या मैदानावर तो पळण्याचा सराव करत होता, त्याच मैदानाच्या वाटेत त्याने लिहिले,”बाबा, मी या जन्मात सैनिक होऊ शकलो नाही पण पुढच्या आयुष्यात नक्की होईन.”

पवनच्या वडिलांनी स्थानिक वाहिनी द गजब हरियाणाला मुलाखतीत हीच माहिती दिली होती. त्या व्हिडिओच्या थंबनेलची हीच बातमी व्हायरल झाली होती. 

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, लष्कराच्या परीक्षेत उत्तीर्ण न झाल्यामुळे तरुणाने आत्महत्या केली, या जुन्या वृत्तपत्राच्या बातमीचा संबंध आताच्या अग्निपथ योजनेशी चुकीच्या पद्धतीने जोडला जात आहे. 

Result : Missing Context

Our Sources

द गजब हरियाणा

ई-टीव्ही भारत

टुडे हरियाणा

भाडस४मीडिया

जर तुम्हांला माझी तथ्य पडताळणी आवडत असेल तर असेच विविध लेख या दुव्यावर टिचकी मारून तुम्ही वाचू शकता.


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular