Authors
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजी साठी सर्वप्रथम वसुधा बेरी यांनी केले आहे.)
गुजरात विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना, सध्या भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करत असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी सुरत आणि राजकोट येथे दोन प्रचार सभा घेऊन राज्यातील राजकीय लढ्यात सामील झाले.
त्यानंतर लगेचच, राहुल गांधींच्या जाहीर भाषणादरम्यान एक गुजराती अनुवादक स्टेजवरून मध्यभागी निघून जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. ज्यांनी 24 सेकंदांचे फुटेज शेअर केले त्यांनी असा आरोप केला की भाषांतरकाराने स्टेज सोडला कारण त्याला राहुल गांधी यांना काय सांगायचे होते ते “समजून घेण्यास आणि भाषांतरित करण्यात अवघड जात” होते.
“गुजरातमधील विधानसभा निवडणूक प्रचार सभेत राहुल गांधीचा भाषांतरकार राहुल गांधीचे भाषण 3 मिनिटेही सहन करू शकला नाही, काँग्रेस नेता असलेला राहुल गांधींचा तो अनुवादक मंचावरून पळून गेला. आणि पत्रकारांना वाटते की देशातील १३० कोटी जनता राहुल गांधीला देशाचा पंतप्रधान बनवेल.” असे ती पोस्ट सांगते.
या आशयाचे अनेक पोस्ट पाहायला मिळाले.
अशा अनेक पोस्ट चे आर्काइव्ह आपण इथे आणि इथे पाहू शकता.
भाजपचे अमित मालवीय हे सुद्धा अनेक ट्विटर वापरकर्त्यांपैकी होते ज्यांनी काँग्रेस नेत्याची खिल्ली उडवणारा व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे.
Fact Check/ Verification
Google वर “राहुल गांधी,” आणि “गुजरात रॅली” साठी कीवर्ड शोध घेतला असता त्यापूर्वी मागील 24 तासांत सोमवारी राजकोट आणि सुरतमधील काँग्रेस नेत्याच्या रॅलींचे तपशील देणारे अनेक रिपोर्ट प्राप्त झाले.
टाइम्स ऑफ इंडियाच्या 21 नोव्हेंबर 2022 च्या अशाच एका रिपोर्ट मध्ये असे म्हटले आहे की, “गुजरातमधील त्यांच्या पहिल्या निवडणूक रॅलीत, गांधींनी सुरत जिल्ह्यातील महुवा येथे आदिवासींच्या मेळाव्याला संबोधित करताना सांगितले की ते देशाचे पहिले मालक आहेत आणि भाजप त्यांचे हक्क हिरावून घेण्याचे काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.”
या रिपोर्टमध्ये व्यासपीठावर राहुल गांधी बोलत असतानाच फोटो वापरण्यात आला आहे. या फोटोची व्हायरल व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सशी तुलना केल्यावर, आम्ही असा निष्कर्ष काढू शकतो की दोन्ही व्हिज्युअल एकाच इव्हेंटचे आहेत.
एक सुगावा घेऊन, आम्ही Google वर “राहुल गांधी,” “सुरत रॅली,” आणि “भाषण” या शब्दांचा शोध करून पाहिला ज्यामुळे आम्हाला गुजरात येथे झालेल्या सार्वजनिक सभेतील राहुल गांधींच्या थेट संवादाचा व्हिडिओ मिळाला. 37:41 मिनिटांवर व्हिडिओमध्ये, आम्ही तोच क्रम पाहू शकतो जो व्हायरल झाला आहे.
लागोपाठच्या फ्रेम्सचे विश्लेषण केल्यावर, सुमारे 38:07 मिनिटांनी, उपस्थित नागरिक राहुल गांधींना हिंदीतच बोलणे सुरू ठेवण्यास सांगताना ऐकले जाऊ शकते – त्यांना त्यांच्या भाषणाच्या गुजराती भाषांतराची आवश्यकता नाही.
या संवादादरम्यान अनुवादक किंचित होकार देताना दिसतो, त्यानंतर तो गांधींना सांगतो की आपण (राहुल गांधी) हिंदीत बोललात तर बरे होईल आणि उपस्थितांना ते समजेल. श्रोत्यांनी गांधींना भाषांतर न करता हिंदीत भाषण सुरू ठेवण्यास सांगितल्यानंतरच अनुवादक निघून गेल्याचे दिसते.
त्यानंतर राहुल गांधी त्याची खात्री करून आपले भाषण सुरू ठेवतात.
शिवाय, आम्हाला या घटनेबाबत अनेक बातम्या पाहायला मिळाल्या. मिंटच्या 21 नोव्हेंबर 2022 च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे, “काँग्रेस नेते राहुल गांधी, जे निवडणूक प्रचारासाठी गुजरातमध्ये आहेत, त्यांच्या भाषणादरम्यान एका व्यक्तीने व्यत्यय आणला. त्या व्यक्तीने राहुल गांधी यांच्या भाषणात व्यत्यय आणला आणि त्यांना भाषण हिंदीत सुरू ठेवण्यास सांगितले आणि अनुवादक वापरू नका. अशी विनंती केली. व्यत्यय येण्यापूर्वी, राहुल गांधी त्यांच्या हिंदी वाक्यांचे गुजरातीमध्ये भाषांतर करण्यासाठी त्यांच्या अनुवादकाकडे वळत होते.”
असे इतर रिपोर्ट येथे आणि येथे पाहता येतील.
विशेष म्हणजे, व्हायरल व्हिडिओमध्ये गांधींच्या भाषणाचा अनुवाद करताना दिसणारा माणूस काँग्रेस नेते भरत सोलंकी आहेत. 21 नोव्हेंबर 2022 रोजी केलेल्या ट्विटमध्ये, सोलंकी यांनी स्वतः स्पष्ट केले की त्यांनी गांधींच्या भाषणाचा गुजरातीमध्ये अनुवाद करणे थांबवले कारण प्रेक्षकांना त्यांचे भाषण फक्त हिंदीतच ऐकायचे होते.
Conclusion
सुरतच्या रॅलीत त्यांचा अनुवादक स्टेज सोडताना दिसल्यानंतर राहुल गांधींवर उपहास करणारी व्हायरल पोस्ट करताना काही संदर्भ वगळण्यात आले आहेत. गांधींच्या भाषणाचा अनुवाद करणारे काँग्रेस नेते भरत सोलंकी प्रेक्षकांना हिंदी समजू लागल्याने मंचावरून खाली उतरले हे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Result: Missing Context
Sources
Report By Times of India, Dated November 21, 2022
YouTube Video By Indian National Congress, Dated November 21, 2022
Report By Mint, Dated November 21, 2022
Tweet By Bharat Solanki, Dated November 21, 2022,
(With Inputs From Prathmesh Khunt)
तुम्हाला एकाद्या क्लेमची फॅक्ट-तपासणी करायची असेल, फीडबॅक द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला 9999499044 वर WhatsApp करा किंवा checkthis@newschecker.in वर ईमेल करा.