त्रिपुरात एका शेतमजुराने तत्परता दाखवत हजारों रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
या पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की त्रिपुरात कोसळणाऱ्या धुवाधार पावसामुळे रेल्वेमार्गाच्या शेजारची माती भुसभुशीत झाल्याने एका अत्यंत अडचणीच्या ठिकाणी रेल्वेमार्गावर इथली दरड कोसळली असल्याचे स्वपन देबर्मा या गरीब शेतमजुराने पहिली. या ठिकाणी काही तासातच अंबासा वरून आगरतळाला जाणारी रेल्वे धडधडत जाणार होती. त्याने हातवारे, इशारे करुन ड्रायव्हरला ट्रेन थांबवण्यास भाग पाडले आणि हजारो लोकांचे प्राण वाचले.

पडताळणी आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली असता फेसबुकवर आम्हाला 23 जून रोजी अपलोड करण्यात आलेली पोस्ट आढळून आली.
याशिवाय 22 जून रोजी देखील फेसुबुकवर शेअर करण्यात आलेली एक पोस्ट आढळून आली.
व्हायरल पोस्टबद्दल आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही गूगलमध्ये काही कीवर्ड्सच्या आधारे शोध घेतला. त्रिपुरात हा प्रसंग नेमका कधी घडला याबाबत अधिक तपास सुरु केला. या शोधा दरम्यान आम्हाला दोनवर्षापूर्वीच्या बातम्या आढळून आल्या.

यात द बेटर इंडिया ने 22 जून 2018 रोजी प्रसिद्ध केेलेली बातमी होती ज्यात म्हटले आहे की, स्वप्नन आणि त्याच्या मुलीने हे पाहिले की संततधार पाऊस पडल्यामुळे माती खचल्याने रुळ खचले आहेत. दोघांनी तत्परता दाखवत रेल्वे थांबवली यामुळे दोन हजार प्रवाशांचे प्राण वाचले. स्वप्नन आणि त्याच्या मुलीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

स्वप्नन ला सरकारी नोकरी ही देण्यात आल्याची व त्याच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतल्याची बातमी टाईम्स आॅफ इंडियाच्या वेबसाईटवर नोव्हेंबर 2018 मध्ये प्रसिद्ध झाली होती.

यावरुन हेच सिद्ध होते की, त्रिपुरातील शेतमजुराने रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवल्याचा प्रसंग जून 2020 चा नसून दोन वर्षापूर्वीचा म्हणजेच जून 2018 चा आहे.
Source
Result
Misleading/ partly False