Friday, December 20, 2024
Friday, December 20, 2024

HomeFact Check2018 चा व्हिडिओ कतार FIFA विश्वचषकात सामूहिक धर्मांतरण सोहळा म्हणून होतोय व्हायरल

2018 चा व्हिडिओ कतार FIFA विश्वचषकात सामूहिक धर्मांतरण सोहळा म्हणून होतोय व्हायरल

(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर इंग्रजी साठी कुशल एच एम यांनी केले आहे.)

2022 FIFA विश्वचषक गेल्या रविवारी कतारमध्ये सुरू झाला, वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू आणि भारतातून फरार झाकीर नाईक यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाल्याचा आरोप करणाऱ्या दाव्यांच्या भाऊगर्दीत सुरुवात झाली. आता, आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, “कतारमधील गैर-मुस्लिमांनी इस्लाम स्वीकारला आहे” असा दावा करून हा व्हिडीओ पसरत असून हे सामूहिक धर्मांतरण एका धर्मोपदेशकाने केल्याचा दावा होत आहे.

Courtesy: Facebook/Momen Al Yeasin

पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पाहिली जाऊ शकते.

Fact check

न्यूजचेकरच्या लक्षात आले की व्हायरल व्हिडिओमध्ये कथितपणे इस्लाम धर्म स्वीकारलेल्या लोकांची संख्या पोस्टनुसार भिन्न आहे. एका वापरकर्त्याने 120 लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याचा दावा केला, तर दुसर्‍याने 560 हून अधिक लोकांनी त्यांचा धर्म बदलल्याचा संशय व्यक्त केला.

त्यानंतर आम्ही व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सचा रिव्हर्स इमेज शोध घेतला, ज्यामुळे आम्हाला 14 मार्च 2018 रोजीच्या या Youtube व्हिडिओकडे नेले “60 फिलिपिनो इस्लाममध्ये बदलले” असे शीर्षक होते. पुढील शोधामुळे आम्हाला 11 मार्च 2018 रोजी अरबी शीर्षकासह आणखी एका Youtube व्हिडिओकडे नेले, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, कतारमधील दोहा येथील अल-शहानिया येथील चॅलेंजर कंपनीमध्ये हे धर्मांतरण झाले.

व्हायरल आणि यूट्यूब दोन्ही व्हिडिओंची तुलना पुष्टी करते की दोन्ही व्हिडीओ हे 2018 मध्ये घडलेल्या एकाच घटनेचे आहेत.

Conclusion

व्हायरल व्हिडिओ हा कतारमधील किमान 2018 चा सामुहिक धर्मांतरण कार्यक्रमाचा आहे आणि दावा केल्याप्रमाणे सध्या सुरू असलेल्या FIFA विश्वचषकादरम्यानचा नाही.

Result: Partly false

Sources
Youtube video published by Mawaidha by sekenke on  March 14, 2018
Youtube video published by Lama ammar on March 11, 2018


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular