Authors
Claim
राहुल गांधींनी सावरकरांवरील ट्विटर पोस्ट डिलीट केल्या.
Fact
व्हायरल माहिती खोटी आहे. राहुल गांधींनी अलीकडे एकही ट्विटर पोस्ट डिलीट केलेली नाही.
राहुल गांधींनी सावरकरांबद्दलच्या सर्व ट्विटर पोस्ट डिलीट केल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरत आहे. दावा केला जात आहे की, सावरकरांच्या नातवाने इशारा देताच राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दलच्या सर्व पोस्ट हटविल्या.
हाच समान दावा आम्हाला फेसबुक वरही पाहायला मिळाला.
“वीर सावरकरांच्या नातवानी FIR फाईल करण्याची धमकी दिल्यानंतर पळपुट्या राहुल गांधीने सावरकरांवर टाकलेले सगळे ट्वीट डिलीट केले आणी चमचे लागलेत डरो मत, राहुल गांधी शेर है.” अशाप्रकारची कॅप्शन युजर्सनी दिली आहे.
Factcheck / Verification
राहुल गांधींनी सावरकरांबद्दलच्या सर्व ट्विटर पोस्ट्स त्यांच्या नातवाच्या एफआयआर करण्याच्या इशाऱ्यानंतर हटवल्याच्या वृत्ताची सत्यता आम्ही तपासली.
वायनाड लोकसभा सदस्य आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने एका विशिष्ट समुदायाची बदनामी केल्याप्रकरणी 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर त्यांना तातडीने खासदारपदावरून अपात्र ठरवण्यात आले.
नंतर, राहुल गांधी जेव्हा मीडियाला भेटले आणि त्यांना केंब्रिज विद्यापीठातील भाषणाबद्दल भाजपने माफी मागण्याची मागणी केल्याबद्दल पत्रकारांनी विचारले तेंव्हा उत्तर देताना ते म्हणाले, “मी सावरकर नाही; मी माफी मागणार नाही.”
राहुल गांधींच्या या विधानांनंतर सावरकरांचे नातू रणजित सावरकर म्हणाले, “राहुल गांधींनी सावरकरांबद्दलच्या विधानांबद्दल माफी मागितली नाही, तर मी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करेन.”
या प्रकरणी वेबसाईट सोशल ब्लेडने गेल्या काही दिवसांत राहुल गांधींनी सावरकरांबद्दलचे ट्विट डिलीट केले आहेत का? याचा तपास केला कारण रणजीत सावरकर यांच्या इशाऱ्यानंतर राहुल गांधींनी सावर्करांबद्दलचे पोस्ट केलेले ट्विट हटवले अशा पोस्ट व्हायरल झाल्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी एकही ट्विटर पोस्ट डिलीट केलेली नाही. विशेषत: 24 मार्च ते 28 मार्चपर्यंत त्यांची एकही ट्विटर पोस्ट हटवण्यात आलेली नाही.
तसेच, त्यांच्या ट्विटर पृष्ठाच्या अवलोकनाने पुष्टी केली की त्यांनी गेल्या काही दिवसांत सावरकरांबद्दल काहीही पोस्ट केलेले नाही. सावरकरांबद्दल अनेक वेळा राहुल गांधींनी रेकॉर्डवर नसून तोंडी प्रतिक्रिया दिल्याची माहिती मिळाली आहे.
Google Cache द्वारे शोध घेतल्यास सावरकरांबद्दल भूतकाळात पोस्ट केलेले आणि हटवलेले कोणतेही रेकॉर्ड सापडले नाही. तसेच, महत्वाचे म्हणजे 2016 मध्ये काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर पेजवर टाकण्यात आलेली सावरकरांबद्दलची पोस्टही हटवण्यात आलेली नाही.
Conclusion
सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी इशारा देताच राहुल गांधींनी सावरकरांबद्दलच्या सर्व ट्विटर पोस्ट हटवल्याच्या पोस्ट खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Result: False
Our Sources
Twitter Post From, INC India, Dated March 25, 2023
YouTube Post From, Moneycontrol SocialBlade
Twitter Post From, ANI, Dated March 28, 2023
Transcontinentaltimes
News Report From, The Economic Times, Dated March 27, 2016
Twitter Post From, INC India, Dated March 23, 2016
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in