Authors
Claim
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांचे निधन झाले.
Fact
टायगर श्रॉफच्या मृत्यूची बातमी पूर्णपणे अफवा आहे. अशी कोणतीही बातमी भारतीय वृत्तपत्रात आढळून आली नाही.
अलीकडेच लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफचा मृत्यू झाल्याचा दावा करणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत. दावा केला जात आहे की अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे.
Fact-Check/ Verification
या प्रकरणाच्या सत्याची पुष्टी करण्यासाठी, अनेक कीवर्ड शोधांमधून पाहिले असता, टायगर श्रॉफच्या मृत्यूची बातमी भारतीय प्रेस आणि देशांतर्गत वृत्त माध्यमांमध्ये आढळू शकली नाही.
शिवाय, 5 मे रोजी टायगर श्रॉफच्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर त्याच्या नवीन चित्रपटाची प्रमोशनल पोस्ट आढळून आली.
आम्ही टायगर श्रॉफ याचे tigerjackieshroff हे इंस्टाग्राम खातेही शोधले मात्र त्यामध्ये आम्हाला त्याने बुधवार दि. १७ मे पर्यंत पोस्ट केलेल्या आढळल्या.
यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी अफवा असल्याचे स्पष्ठ झाले आहे.
न्यूजचेकर ने यासंदर्भात यापूर्वी बांगला आणि नेपाळी भाषेतही तथ्य तपासण्या केल्या आहेत. त्या इथे आणि इथे वाचता येतील.
Conclusion
अभिनेता टायगर श्रॉफचा मृत्यू झाल्याचा दावा काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केला जात असून जो पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे.
Result: False
Our Sources
Tiger Shroff Facebook
Tiger Shroff Twitter
Instagram account tigerjackieshroff
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in